पाचवे बालकुमार साहित्य संमेलन आजपासून अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 09:32 PM2017-11-30T21:32:23+5:302017-11-30T22:58:49+5:30

विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आयोजित दोन दिवसीय ५ वे बालकुमार साहित्य संमेलन प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड, अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी होत आहे. संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, संमेलन स्थळ साने गुरुजी साहित्य नगरी बालक-पालक, नामवंत साहित्यिक, सिने कलावंतांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

Fifth Balkumar Sahitya Sammelan will be held in Akolat from today | पाचवे बालकुमार साहित्य संमेलन आजपासून अकोल्यात

पाचवे बालकुमार साहित्य संमेलन आजपासून अकोल्यात

googlenewsNext
ठळक मुद्देसाने गुरुजी साहित्य नगरी सज्जसिने कलावंत मेघना एरंडेची प्रमुख उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला (साने गुरुजी साहित्य नगरी) : विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आयोजित दोन दिवसीय ५ वे बालकुमार साहित्य संमेलन प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड, अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी होत आहे. संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, संमेलन स्थळ साने गुरुजी साहित्य नगरी बालक-पालक, नामवंत साहित्यिक, सिने कलावंतांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. डबिंग व सिने कलावंत मेघना एरंडे-जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
शुक्रवारी, सकाळी ९ वाजता भाषा गौरव दिंडी व विविध साहित्य दालनांच्या उद्घाटनाने संमेलनाला प्रारंभ होणार आहे. लोक साहित्य या मुख्य संकल्पनेवर आधारित दिंडीमध्ये अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आणि शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी लेजीम, वासुदेव, ओवी व शेतकरी गीत, जोगवा, गोंधळ, अभंग, पोतराज तसेच कोळीगीत, भारुड, लावणी, पोवाडा आणि कीर्तन आदी प्रकार सादर करतील. 



संमेलनातील विविध आकर्षणातील साहित्य दालनांमध्ये लोककवी डॉ.विठ्ठल वाघांची साहित्य गुहा, मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषांची समृद्ध दालने, संत साहित्य, कविता लेखन व वाचन, बालचित्रांची दुनिया आणि काष्ठचित्र दालन, पक्षी व निसर्ग चित्र, छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 
संमेलनाचे मुख्य उद्घाटन सत्र सकाळी १0.३0 वाजता प्रारंभ होईल. बाल साहित्यिक व संमेलनाध्यक्ष शंकर कर्‍हाडे यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ.संगीता बर्वे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी डबिंग व सिने कलावंत मेघना एरंडे-जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहील. 


दुपारी १.३0 वाजता सिने कलावंत मेघना एरंडे-जोशी यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या फक्त निवासी बालकुमार प्रतिनिधींसाठी कॅम्प फायर असून, यामध्ये धमाल मनोरंजनाचे कार्यक्रम राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ.गजानन नारे, स्वागताध्यक्ष प्रा.ललित काळपांडे, समन्वयक सीमा शेटे-रोठे यांनी दिली. 


‘मला काही तरी सांगायचे’ परिसंवाद 
दुपारी ३.३0 वाजता शकुंतलाबाई मालोकार स्मृती सर्मपित बालक-पालकांसाठी ‘मला काही तरी सांगायचे’ या विषयावर व्याख्याते सचिन बुरघाटे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. या परिसंवादात विविध जिल्ह्यांमधील व शाळांमधील बालकुमार प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत.

Web Title: Fifth Balkumar Sahitya Sammelan will be held in Akolat from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.