वेळेवर उपचार न मिळाल्याने चिमुकलीचा मृत्यू; नातेवाईकांनी आरोग्य केंद्राल ठोकले कुलुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 06:00 PM2018-03-09T18:00:28+5:302018-03-09T18:00:28+5:30

मळसूर (जि. अकोला) : वेळेवर उपचार न मिळाल्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ९ मार्च रोजी घडली.

Death of a child due to non-timely treatment; Relatives locked health center | वेळेवर उपचार न मिळाल्याने चिमुकलीचा मृत्यू; नातेवाईकांनी आरोग्य केंद्राल ठोकले कुलुप

वेळेवर उपचार न मिळाल्याने चिमुकलीचा मृत्यू; नातेवाईकांनी आरोग्य केंद्राल ठोकले कुलुप

googlenewsNext
ठळक मुद्देगावातील प्रकाश कंकाळ यांची मुलगी रिना कंकाळ हीला ताप आल्याने तिच्या वडिलांनी तिला मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.मुलीची प्रकृती बिघडत असल्याने मुलीच्या नोतवाईकांनी पुढील उपचारासाठी अकोला हालविण्यासाठी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेची मागणी केली.चिमुकलीला उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे हलविले. परंतु काही वेळातच उपचार दरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

मळसूर (जि. अकोला) : वेळेवर उपचार न मिळाल्याने सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ९ मार्च रोजी घडली. मळसुर येथील रिना प्रकाश कंकाळ असे मृतक चिमुलीचे नाव आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने संतप्त झालेल्या रुग्ण चिमुकलीच्या नातेवाईकांनी केंद्राला कुलूप ठोकले.

गावातील प्रकाश कंकाळ यांची मुलगी रिना कंकाळ हीला ताप आल्याने तिच्या वडिलांनी तिला मळसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सकाळी ८.३० वाजता प्राथमिक आरोग्य केद्रात वैद्यकीय अधिकारीच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीची प्रकृती बिघडत असल्याने मुलीच्या नोतवाईकांनी पुढील उपचारासाठी अकोला हालविण्यासाठी आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेची मागणी केली.परंतु त्यांना रुग्णवाहिकाही मिळाली नाही. यामध्ये बराच वेळ गेल्याने चिमुकलीला वेळेवर उपचार मिळाले नाही. अखेर नातेवाईकांनी खासगी वाहनाने चिमुकलीला उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे हलविले. परंतु काही वेळातच उपचार दरम्यान मुलीचा मृत्यू झाला.

हलगर्जीपणाचा तिसरा बळी
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांना मुख्यालयी राहण्याची एलर्जी आहे. रात्रीला वैद्यकीय अधिकारी नेहमीच गैरहजर असतात. दिवसा उशिरा येणे हलगर्जी करणे या कारणामुळे यापुर्वी सुध्दा वेळेवर उपचार न मिळाल्याने वेदांत कंकाळ व मानसी कंकाळ या बालकांचा तडफडून मृत्यु झाला आहे. मात्र, तरीही वरिष्ठ अधिकाºयांनी दखल न घेतल्याने हलगर्जीपणाचा आज तिसरा बळी गेला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर वरिष्ठ कारवाई करणार, असा संतप्त सवाल चिमुकलीच्या नातेवाईकांनी उपस्थित केला.



रविवारी पल्स पोलीओ मोहिम राबवायची असल्याने मी रुग्णवाहीका दुरुस्त करण्यासाठी अकोला येथे गेला होते. तेथून परत घरी यायला उशीर झाला. त्यामुळे, शुकवारी सकाळी आरोग्य केंद्रात पोहचण्यास उशीर झाला. तोपर्यंत चिमुकलीला तिच्या नातेवाईकांनी अकोला येथे नेले होते.
- डॉ. आसीफ शेख, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मळसुर

Web Title: Death of a child due to non-timely treatment; Relatives locked health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.