गावंडगाव येथे भावजयीला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 01:35 AM2017-12-09T01:35:08+5:302017-12-09T01:37:16+5:30

आलेगाव : विहिरीत पडलेल्या लहान भावाच्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात  इसमाचा मृत्यू झाल्याची घटना चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गावंडगाव  येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत  आहे. 

Both of them die in Gavandgaon's attempt to save the brother-in-law | गावंडगाव येथे भावजयीला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही मृत्यू

गावंडगाव येथे भावजयीला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघांचाही मृत्यू

Next
ठळक मुद्देचान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील गावंडगाव येथील घटनादोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्क
आलेगाव : विहिरीत पडलेल्या लहान भावाच्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात  इसमाचा मृत्यू झाल्याची घटना चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या गावंडगाव  येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. दोघांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत  आहे. 
गावंडगाव येथील निर्मला हुकूमचंद जाधव (३५) या गावंडगाव शेत शिवारातील  शेतात बैल चारण्यासाठी गेल्या होत्या. बैल चरत असताना अचानक एका बैलाने  निर्मला यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यापासून वाचण्याचा प्रयत्न करीत असताना  निर्मला जाधव या  शेतातील विहिरीत पडल्या. ही घटना शेतात उपस्थित असलेले  निर्मलाच्या पतीचे मोठे भाऊ वसराम जाधव यांच्या लक्षात येताच, त्यांनी निर्मलाला  वाचविण्याकरिता विहिरीत उडी घेतली. विहिरीत पाणी जास्त असल्याने दोघांचाही  पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पातूरचे तहसीलदार डॉ.  रामेश्‍वर पुरी, चान्नीचे प्रभारी ठाणेदार मुकुंद वाघमोडे, मंडळ अधिकारी विजय  राठोड, हेपोका अदिनाथ गाठेकर, देवेंद्र चव्हाण, मोहन ढवळे, अमोल कांबळे,  देवेंद्र बाभूल, शेखर कोंद्रे यांनी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी चान्नी पोलीस  स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोघांचेही  मृतदेह  शवविच्छेदनासाठी अकोला येथे पाठवण्यात आले. 

Web Title: Both of them die in Gavandgaon's attempt to save the brother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.