ब्लास्टींगचा ट्रॅक्टर विहीरीत कोसळला; एक ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 05:38 PM2019-05-31T17:38:50+5:302019-05-31T17:38:55+5:30

धामणगाव बढे (जि. बुलडाणा) : सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहीर खोदकामादरम्यान ब्लास्टींगचा ट्रॅक्टर चालकासह विहीरीत पडून झालल्या दुर्घटनेत एक जण ठार झाला तर चार जण जखमी झाले आहे.

Blasting tractor collapsed; One killed, four injured | ब्लास्टींगचा ट्रॅक्टर विहीरीत कोसळला; एक ठार, चार जखमी

ब्लास्टींगचा ट्रॅक्टर विहीरीत कोसळला; एक ठार, चार जखमी

googlenewsNext

धामणगाव बढे (जि. बुलडाणा) : सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहीर खोदकामादरम्यान ब्लास्टींगचा ट्रॅक्टर चालकासह विहीरीत पडून झालल्या दुर्घटनेत एक जण ठार झाला तर चार जण जखमी झाले आहे.  जखमीपैकी दौघांची प्रकृती गंभीर असून अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमीपैकी एकास औरंगाबाद येथे हलविण्यात आले असून एकावर बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात येत असलेल्या बामणदा गावानजीक असलेल्या हिवरी धरण क्षेत्रामध्ये शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
या घटनेमध्ये प्रविण रामदास सोनाने (२८) हा ठार झाला असून शिवाजी बाबुराव जाधव (२५), शेख सईद शेख नजीर (३०) हे दोघे गंभीर जखमी झाले असून अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. शिवाजी बाबुराव जाधव याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला बुलडाणा येथे प्रथमोपचार करून त्वरेने औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे तर ट्रॅक्टर चालक शेख सईद शेख नजीर याच्यावर बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
बामणदा-खांडवा या गट ग्रामपंचायतीसाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना विहीरीचे जवळच असलेल्या हिवरी धरण क्षेत्रात खोदकाम सुरू आहे. या विहिरीत ब्लास्टींग करण्यासाठी ट्रॅक्टर आणण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विहीरीत चार मजूर आतील खरप काढून क्रेनद्वारे वरती आणण्याचे काम करत होते. या दरम्यान, ब्लास्टींगसाठी आणण्यात आलेले ट्रॅक्टर अचानक चालकासह थेट विहीरीत कोसळले. त्यामध्ये प्रवीण रामदास सोनोने, शिवाजी बाबुराव जाधव, शेख सईद शेख नजीर हे तिघे गंभीर जखमी झाले तर अन्य दोन किरकोळ जखमी झाले होते. जखमीपैकी तिघांना बुलडाणा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता प्रविण रामदास सोनोने यास डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे त्याचे काका तथा  सरपंच डिगांबर लक्ष्मण सोनाने यांनी सांगितले. शिवाजी जाधव यास औरंगाबाद येथे हलविण्यात आले तर शेख सईद वर बुलडाणा येथेच उपचार करण्यात येत आहे. अपघाताचे वृत्त कळताच  बामणदा, हिवरी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. 

बैलगाडी ते रुग्णवाहिका
स्थानिकांनी जखमींना प्रथमत: हिवरी धरण क्षेत्रातील दुर्घटनेच्या स्थळापासून बैलगाडीद्वारे हिवरी-बामणदा मार्गावर आणले. तेथून रिक्षाद्वारे बामणदा येथे जखमींना आणण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे या जखमींना थेट बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दोघे थोडक्यात बचावले
या विहीरीचे काम  २० त २२ फुट झाले असून विहीरीचा घेर वरील बाजूस ३० फुट व तळाला २० फुट रुंद असल्याने ट्रॅक्टर विहीरीत पडल्यानंतरही खाली काम करणारे दोघे थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ इजा झाली असून ते गावातच असल्याची माहिती आहे. मात्र त्यांची नावे कळू शकली नाहीत.

Web Title: Blasting tractor collapsed; One killed, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.