तत्कालीन ग्रामपंचायतमधील ८६ कर्मचाऱ्यांचे अकोला मनपात होणार समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:07 PM2018-09-25T12:07:05+5:302018-09-25T12:10:31+5:30

समायोजनाची प्रक्रिया तातडीने निकाली काढण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिल्याने कर्मचाºयांच्या सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे.

86 employees of erstwhile Gram Panchayat will be adjusted | तत्कालीन ग्रामपंचायतमधील ८६ कर्मचाऱ्यांचे अकोला मनपात होणार समायोजन

तत्कालीन ग्रामपंचायतमधील ८६ कर्मचाऱ्यांचे अकोला मनपात होणार समायोजन

Next
ठळक मुद्दे मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यानंतर तत्कालीन ग्रामपंचायतमधील ८६ कर्मचाºयांचे समायोजन रखडले होते. यासंदर्भात स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांनी पाठपुरावा केला. सभागृहात विशाल इंगळे यांनी हा विषय नमूद केला असता, महापौरांनी मंजुरी दिली.

अकोला : मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यानंतर तत्कालीन ग्रामपंचायतमधील ८६ कर्मचाºयांचे समायोजन रखडले होते. सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांनी संबंधित कर्मचाºयांच्या समायोजनासाठी पाठपुरावा करीत खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या शिफारस पत्राचे वाचन केले. या कर्मचाºयांच्या समायोजनाची प्रक्रिया तातडीने निकाली काढण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी दिल्याने कर्मचाºयांच्या सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरालगतच्या प्रमुख १३ ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपात समावेश झाला. तत्कालीन ग्रामपंचायतच्या मालकीच्या सर्व जागा, इमारती, शासकीय दस्तऐवज ताब्यात घेण्यासह ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ८६ कर्मचाºयांनाही मनपात सामावून घेण्यात आले. परंतु, मागील दीड वर्षांपासून त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया रखडल्याने त्यांना तुटपुंज्या वेतनावर कामकाज करावे लागत होते. मनपाने जिल्हा परिषदेकडून कर्मचाºयांच्या संख्येची रीतसर यादी प्राप्त केली असली, तरी समायोजनाची प्रक्रिया रखडली होती. यासंदर्भात स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांनी पाठपुरावा केला. यादरम्यान, खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी शासनाच्या निकषानुसार या कर्मचाºयांचे समायोजन करून त्यांना वेतन देण्याची शिफारस केली. सभागृहात विशाल इंगळे यांनी हा विषय नमूद केला असता, महापौरांनी मंजुरी दिली.


उघड्यावर मांस विक्री नकोच!
आगामी दिवसांत हिंदू धर्मियांचा पवित्र सण म्हणून ओळखल्या जाणारा नवदुर्गा उत्सव साजरा केला जाईल. यादरम्यान, शहरात कोठेही उघड्यावर मांस विक्री नकोच, अशी आग्रही भूमिका प्रभाग १० मधील नगरसेवक अनिल गरड यांनी मांडली. तत्कालीन नगर परिषदेच्या कार्यकाळात मोजक्या ठिकाणी मांस विक्रीच्या दुकानांना परवानगी दिली होती. आता सर्वत्र सुळसुळाट झाला असून, संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. यावर नोटीस जारी करण्याचे निर्देश आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले.

गणेश मंडळांचे मानले आभार
जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील गणेश मंडळांनी विसर्जन कुंडाचे निर्माण केले होते. यामध्ये कौलखेडस्थित छत्रपती उद्यान, हिंगणा घाट, सातव चौक, मलकापूर परिसर तसेच डाबकी रोडवर जय बाभळेश्वर चौकात कुंड तयार केले होते. यामुळे प्रशासनावरील ताण कमी झाल्याचा मुद्दा मांडत प्रभाग ८ चे नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी अशा गणेश मंडळांचे कौतुक करीत त्यांच्या आभाराचा प्रस्ताव मांडला. त्याला सभागृहाने सर्वानुमते संमती दिली.


दिव्यांगांना दिलासा
निकषानुसार ४० टक्केपेक्षा अधिक दिव्यांग असणाºया व्यक्तींना त्यांच्या विवाहासाठी मनपाकडून १० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच ६० ते १०० टक्के दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी ६०० रुपये महिना रक्कम खात्यात जमा केली जाईल. ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक असेल त्यांना ८०० रुपये दिले जातील.

उर्दू शिक्षकांचे होणार समायोजन!
मनपाच्या शिक्षण विभागात उर्दू माध्यमासाठी शिक्षकांची पदे रिक्त आहेत. संचमान्यतेनुसार रिक्त जागांवर बदली म्हणून सात शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील बहुतांश शिक्षक जिल्ह्याबाहेरील तसेच नगर परिषदेवर कार्यरत आहेत. त्यांच्या समायोजनाला सभागृहाने मंजुरी दिली.

 

Web Title: 86 employees of erstwhile Gram Panchayat will be adjusted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.