काष्टीत पोलिसास मारहाण : दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:25 PM2018-09-01T12:25:34+5:302018-09-01T12:25:51+5:30

काष्टी येथील आठवडे बाजारात वाहतूक पोलीस प्रताप देवकाते हे वाहन चालकांना सूचना देत असताना दोन व्यक्तींनी देवकाते यांना मारहाण केली.

Weasel policeman assault: both are in custody | काष्टीत पोलिसास मारहाण : दोघे ताब्यात

काष्टीत पोलिसास मारहाण : दोघे ताब्यात

Next

काष्टी : काष्टी येथील आठवडे बाजारात वाहतूक पोलीस प्रताप देवकाते हे वाहन चालकांना सूचना देत असताना दोन व्यक्तींनी देवकाते यांना मारहाण केली. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी मयुर निळकंठ गजरमल (रा.कुळधरण ता.कर्जत) व चंपालाल लक्ष्मण घोडके (रा. श्रीगोंदा) दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस प्रताप देवकाते काष्टी येथे आठवडे बाजार असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून बाजार समितीच्या गाळ्यासमोर नगर- दौंड रस्त्यावरील वाहतुक सुरळीत काम करण्याचे काम करीत होते. ताब्यात घेतलेल्या दोघांना वाहन बाजुला घेण्याचे सांगितल्याने देवकाते यांना मारहाण केली.

Web Title: Weasel policeman assault: both are in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.