गावक-यांनी वाळू तस्करांना पिटाळले : वांगी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:25 AM2019-07-18T11:25:47+5:302019-07-18T11:26:59+5:30

तालुक्यातील सराला गोवर्धन तसेच उक्कलगाव, दवणगाव परिसरात वाळू तस्करांनी बेसुमार उपसा केलेला असताना आता प्रवरा नदीपात्रातील वांगी परिसराकडे मोर्चा वळविला.

Villagers scolded Smugglers: incident in Vangi | गावक-यांनी वाळू तस्करांना पिटाळले : वांगी येथील घटना

गावक-यांनी वाळू तस्करांना पिटाळले : वांगी येथील घटना

Next

श्रीरामपूर : तालुक्यातील सराला गोवर्धन तसेच उक्कलगाव, दवणगाव परिसरात वाळू तस्करांनी बेसुमार उपसा केलेला असताना आता प्रवरा नदीपात्रातील वांगी परिसराकडे मोर्चा वळविला. मात्र गावकऱ्यांनी एकजूट दाखवत गावठी कट्ट्याने धमकाविणा-या वाळू तस्करांना पिटाळून लावले. आता पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
श्रीरामपुरातील वाळू तस्करी कोणत्या थराला गेली आहे हे या घटनेवरुन उघड झाले आहे. गोदावरी नदीला पाणी आल्याने वाळू तस्करांचा मोर्चा आता प्रवरेकडे वळाला आहे. तेथे ते जम बसवू पाहत आहेत. मंगळवारी रात्री वांगी परिसरात काही वाळू तस्कर मालमोटारी व इतर वाहने घेऊन आली. वाळू उपशा करण्यासाठी आले असता याची खबर गावकऱ्यांना लागली. यावेळी सरपंच काकासाहेब साळे, उपसरपंच सोमनाथ पवार, विष्णू जगताप, कैलास जगताप, माऊली पवार, राहुल पवार, किरण जगताप, सर्जेराव जगताप, शांतीलाल पवार, किशोर जगताप, राहुल साळे, बाळासाहेब रोहोकले, सुभाष मोरे, भगिरथ जगताप, भगिरथ मोरे, चिलीया जगताप व इतर ५० ते ६० ग्रामस्थांनी रात्री गावात एकत्र येऊन वाळू तस्करांना विरोध केला.
यावेळी काही तस्करांनी गावठी कट्टे दाखवून ग्रामस्थांना धमकविण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी फावड्यांचे दांडे, दगड उचलत धाडसाने वाळू रोखण्याची भूमिका घेतली. त्यामुळे वातावरण पाहून वाळू तस्कर गाड्यांसह फरार झाले. सरपंच काकासाहेब साळे यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. उपअधीक्षक राहुल मदने यांना घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस फौजफाटा पाठविला. ग्रामस्थांबरोबर चर्चा केली.
ग्रामस्थ सामूहिकरित्या प्रशासनाला निवेदन देणार असल्याचे सरपंच काकासाहेब साळे यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे वाळू तस्करांचा डाव वांगी परिसरात हाणून पाडण्यात आला. पोलिसांनीही तत्परता दाखविली. याप्रकरणी उशिरापर्यंत लेखी तक्रार देण्यात आली नव्हती. ग्रामस्थही गावठी कट्ट्याच्या प्रकारामुळे भयभीत झाले. मात्र संघटितपणामुळे वांगी ग्रामस्थ वाळू तस्करांना भारी भरले.

जिल्हा पोलीस प्रमुख ईशू सिंधू यांनी वाळू उपशाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलीस दलही सतर्क झाले आहे. त्यामुळे वांगी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Villagers scolded Smugglers: incident in Vangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.