आॅनलाईन लोकमत
शेवगाव : नगर जिल्ह्याच्या विविध भागातून दुचाकी चोरणाºया दोघांना शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अमोल बबन बांदल (वय २८ रा.हनुमानटाकळी ता. पाथर्डी) व किशोर ज्ञानदेव सरोदे (रा. वडुले वाघोली, ता. शेवगाव) ही अटक केलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून पंधरा दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.
अमोल बांदल यास ९ आॅगस्ट रोजी रात्री आठ वाजता मिरी रस्त्यावर तर किशोर सरोदे यास शनिवारी सकाळी शेवगाव येथे ताब्यात घेतले. त्यांनी शेवगाव, पाथर्डी, शिक्रापूर, वाघोली, शिरुर, राहुरी व नगर शहरातून दुचाकी चोरल्या आहेत. एका दुचाकी चोरीचा तपास करीत असताना पोलिसांच्या हाती ही टोळी लागली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.