नाशिक-पुणे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दोन जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:50 AM2018-02-19T11:50:19+5:302018-02-19T11:51:17+5:30

कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावरील एकोणीस मैल शिवारातील बिकानेर ढाब्याच्या समोर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.

Two people killed on the spot on the Nashik-Pune highway | नाशिक-पुणे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दोन जण जागीच ठार

नाशिक-पुणे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दोन जण जागीच ठार

Next

संगमनेर : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावरील एकोणीस मैल शिवारातील बिकानेर ढाब्याच्या समोर रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली.
संतोष बबन सातपुते व संतोष मधुकर खरे (दोघेही रा. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत. नाशिकहून पुणेकडे जाणा-या कंटेनरने (आर. जे. ०१, जी. बी. ६३५१) खरे व सातपुते हे प्रवास करित असलेल्या दुचाकीला ( एम. एच. १७, जे. ४७७७) धडक दिली. यात सातपुते व खरे हे दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Web Title: Two people killed on the spot on the Nashik-Pune highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.