श्रीरामपुरात दोन किराणा दुकाने फोडली : ७० हजारांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:28 PM2020-04-25T17:28:02+5:302020-04-25T17:28:39+5:30

शहरातील बाजारतळावरील दोन किराणा दुकान चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री फोडले.

Two grocery shops blown up in Shrirampur: Rs 70,000 looted | श्रीरामपुरात दोन किराणा दुकाने फोडली : ७० हजारांचा ऐवज लांबविला

श्रीरामपुरात दोन किराणा दुकाने फोडली : ७० हजारांचा ऐवज लांबविला

Next

श्रीरामपूर : शहरातील बाजारतळावरील दोन किराणा दुकान चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री फोडले. या दुकानातून चोरट्यांनी ७० हजारांचा किराणा माल चोरून नेला आहे.
बाजार तळावर नगरपरिषद शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कांकरिया यांच्या शैलेश किराणा दुकानाचे मागील बाजूचे शटर कटावणीने वाकवून चोरट्यांनी दुकानातील सुमारे ४० हजाराचा किराणा माल चोरून नेला आहे. चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्यावर कपडा टाकून चोरी केली. शुक्रवारी रात्री पावणेतीन वाजण्याच्या ही चोरी झाली आहे.
श्रीरामपूर-संगमनेर रोडवरील महावीर पापडीवाल यांच्या संतोष किराणा या नावाने दुकान आहे. या दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी दुकानातील तेल, तुपाचे बॉक्स, चणाडाळ, साखर, साबण असा सुमारे ३० हजाराचा माल चोरून नेला आहे. चोरटे रेल्वेलाईन पार करून पलीकडे गेले असावेत. रेल्वेलाईनजवळ हरभरा डाळ पडल्याचे निदर्शनास आले. कांकरिया व पापडीवाल यांनी दोघांनी दुकान चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

Web Title: Two grocery shops blown up in Shrirampur: Rs 70,000 looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.