भिंगार येथे तीन महिलांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 02:24 PM2018-03-25T14:24:53+5:302018-03-25T14:24:53+5:30

भिंगार येथे तरूणाने तीन महिलांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले. २३ मार्च रोजी आलमगीर येथील मिलिंद कॉलनीत ही घटना घडली. याप्रकरणी प्रियंका सूर्यकांत तिवारी (वय २२) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Three women were assaulted at Bhingar | भिंगार येथे तीन महिलांवर प्राणघातक हल्ला

भिंगार येथे तीन महिलांवर प्राणघातक हल्ला

Next

हमदनगर: भिंगार येथे तरूणाने तीन महिलांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले. २३ मार्च रोजी आलमगीर येथील मिलिंद कॉलनीत ही घटना घडली. याप्रकरणी प्रियंका सूर्यकांत तिवारी (वय २२) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अजय उर्फ निखिल लक्ष्मण शिंदे (वय २३ रा. बुरूडगाव रोड, नगर) याच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिंदे याने २३ मार्च रोजी प्रियंका तिवारी यांच्या घरी येऊन तुमच्या बहिणीच्या लग्नात खूप खर्च केल्याचे सांगत शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी त्याने हातातील कोयत्याने निधी तिवारी हिच्यावर हल्ला करून तिला जखमी केले. यावेळी प्रियंका तिवारी व तिची आई मध्ये गेल्या असताना त्यांनाही शिंदे याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन करेवाड हे करत आहेत.

Web Title: Three women were assaulted at Bhingar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.