उसावरील हुमणी अळीचे नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:02 PM2018-06-15T12:02:47+5:302018-06-15T12:02:47+5:30

कमी पाऊस झाल्याने ऊस पिकात हुमणी अळीचे भुुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत अंडी घालून हुमणी अळीची निर्मिती होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियंत्रणाचे उपाय करून अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करणे आवश्यक आहे.

Sugarcane control of sugarcane | उसावरील हुमणी अळीचे नियंत्रण

उसावरील हुमणी अळीचे नियंत्रण

googlenewsNext

काकासाहेब शिंदे
कमी पाऊस झाल्याने ऊस पिकात हुमणी अळीचे भुुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत अंडी घालून हुमणी अळीची निर्मिती होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियंत्रणाचे उपाय करून अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करणे आवश्यक आहे.
जून महिन्याच्या दुस-या आठवड्यात जन्मलेली अळी ऊस व इतर संवर्ग पिके (ज्वारी, बाजरी, मका इ.) खाऊन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते. नुकसानीचे गांभीर्य आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात शेतक-यांच्या लक्षात येते. तोपर्यंत मोठे नुकसान झालेले असते. अशा वेळी हुमणी अळीचा प्रादुर्भाव होण्याअधीच जून महिन्यातच हुमणी अळीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.

हुमणी अळीचे जैविक नियंत्रण
मेटारायझियम व बिव्हेरिया एकरी प्रत्येकी दोन लिटर याप्रमाणे ड्रीप किंवा शेणखत, कंपोस्ट खतात मिसळून जमिनीला वापसा असताना द्यावे. निंबोळी पेंड, करंज पेंड, तंबाखू डस्ट तिन्ही एकत्र मिसळून एकरी प्रत्येकी २०० ते २५० किलो रासायनिक खत किंवा इतर खतांबरोबर द्यावे. कीडग्रस्त क्षेत्रात एकरी १ ते १.२५ लाख परोपजीवी ट्रायकोग्रामा सोडावेत.
तांत्रिक नियंत्रण
प्रकाश सापळ्यांचा वापर करणे किंवा प्रकाश सापळे उपलब्ध नसल्यास प्लॅस्टिक घमेल्यात रासायनिक औषध व पाणी मिसळून त्यावर इलेक्ट्रिक बल्ब लावला असता रात्री हुमणी किडीचे भुंगेरे घमेल्यात जमा होऊन मरतात.ही उपाय योजना जून महिन्याचे सुरुवातीला केल्यास प्रौढ अवस्थेतील भुंगेरे मरतात व पुढील काळात हुमणी अळीचा होणारा त्रास आपोआप नियंत्रणात येतो.
रासायनिक उपाय योजना
रिजेंट एकरी १० किलो किंवा ८ किलो फरटेरा या रासायनिक औषधांचा वापर करावा. क्लोरोपायरीफॉस (५० टक्के) अधिक सायपर मिथ्रीन (५ टक्के) (हामला ,कॅनॉन इ.) एकरी दोन लिटर याप्रमाणे ड्रीप अथवा ड्रेनचिंग करावे. क्लोथ्रीडयानील (५० टक्के डब्लूडिजी) (डेंटासू) १५० ग्राम प्रति एकर वापरावे. इमीडाक्लोपीड (४० टक्के) अधिक फिप्रोनील (४० टक्के) (लेसेंटा) १५० ग्राम प्रति एकर वापरावे. जून,जुलै मध्ये एकरी १० किलो क्विनॉलफॉस दाणेदार शेतात घालावे. हुमणी कीड नियंत्रणासाठी लागणा-या सर्व निविष्ठा ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे उपलब्ध आहेत. शेतकºयांनी ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा.

 

Web Title: Sugarcane control of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.