मुळा डाव्या कालव्यातून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 06:39 PM2017-09-02T18:39:15+5:302017-09-02T18:39:15+5:30

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शनिवारी १०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले़ मुसळवाडी तलावासाठी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती उपअभियंता विकास गायकवाड यांनी दिली़ सुमारे पंधरा दिवस पाणी सुरू राहणार आहे़

Roots left water from the left canal | मुळा डाव्या कालव्यातून पाणी सोडले

मुळा डाव्या कालव्यातून पाणी सोडले

Next
कमत न्यूज नेटवर्कराहुरी : मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शनिवारी १०० क्यूसेकने पाणी सोडण्यात आले़ मुसळवाडी तलावासाठी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती उपअभियंता विकास गायकवाड यांनी दिली़ सुमारे पंधरा दिवस पाणी सुरू राहणार आहे़मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर गेल्या पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे़ २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या २२ हजार ५४३ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाल्याची माहिती धरण अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली़ पाऊस थांबल्याने पाण्याची आवक १३९३ क्यूसेकवर खाली घसरली आहे़ दिवसभर ऊन व ढगाळ वातावरण होते़मुळा धरणाच्या लाभक्षेत्रावरही पावसाने पाठ फिरविली आहे़ हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने धरणाचा साठा स्थिरावला आहे़ यंदा धरण भरणार असले तरी नेमकी कधी भरणार याबाबत शेतक-यांमध्ये उत्सुकता आहे़ त्यामुळे शेतक-यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़

Web Title: Roots left water from the left canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.