आॅनलाईन लोकमत
संगमनेर, दि. १२- तालुक्यातील बोटा परिसरात अवैधपणे दारू विक्री होत असलेल्या हॉटेलवर छापा टाकून घारगाव पोलिसांनी दारू साठा जप्त केला. हॉटेल विजयश्री येथून याप्रकरणी एकास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी दिली. शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.