नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी

By admin | Published: September 23, 2014 01:08 AM2014-09-23T01:08:00+5:302014-09-23T01:37:18+5:30

अहमदनगर : गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते नवरात्रौत्सवाचे़ दांडिया आणि गरबा नृत्य यांसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात

Navaratri festival preparation of the sea | नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी

नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी

Next


अहमदनगर : गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर भाविकांना वेध लागतात ते नवरात्रौत्सवाचे़ दांडिया आणि गरबा नृत्य यांसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात मंडळे व्यस्त झाली आहे़
आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रौत्सवास प्रारंभ होतो़ नवरात्र उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे देवीच्या मुर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, मुर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात कारागीर व्यस्त आहेत़ नवरात्रोत्सवात विविध मंडळांकडून देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते़ त्यासाठी दरवर्षी मंडळांकडून देवीच्या आकर्षक मुुर्ती खरेदी केल्या जातात़ नगरमध्ये सुमारे १० कारखान्यांमध्ये देवीच्या मुर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्यात असून, सध्या रंग देण्याचे काम सुरु आहे़ अनेक मंडळांकडून आगाऊ नोंदणी करण्यात आली असून, मंडप उभारणीच्या कामाने वेग घेतला आहे़
म्हैसासूर, शेरावली, तुळजापूरची देवी अशा देवींच्या मुर्ती बाजारात उपलब्ध आहे़ किमान १ फूट ते ६ फुटांपर्यंत उंचीच्या मुर्ती तयार करण्यात आल्या असून, दरवर्षी यातून लाखो रुपयांची उलाढाल होते़ मुर्तीच्या आकारानुसार आणि कलाकुसरीनुसार मुर्तींचे दर ठरविण्यात आले आहे़ कमीतकमी ५०० ते जास्तीत जास्त ११ हजार रुपयांपर्यंत मुर्तींचे दर आहेत़ मुंबई, उल्हासनगर, हैदराबाद येथील देवी भक्तांनी नगरमधील कारखान्यांकडे मुर्तींची आगाऊ नोंदणी केली आहे़ घटस्थापनेसाठी आवश्यक असलेले सुगडे तयार करण्यात कुंभार समाज व्यस्त असून, राजस्थानहून मोठ्या प्रमाणात सुगडे आयात केले जातात़

Web Title: Navaratri festival preparation of the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.