महापालिका निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 10:41 PM2017-09-12T22:41:39+5:302017-09-12T22:41:39+5:30

अहमदनगर : २०१८ मध्ये होणाºया महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र मिळाले आहे. त्यानुसार शहरातील मतदार याद्या ३ आॅक्टोबरपासून अद्ययावत करण्याबाबत प्रशासनाने तयारी केली असून शहरात मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी दोनशे बीएलओ (ब्लॉक लेवल आॅफिसर) नियुक्त केले आहेत.

muncipal,corportation,election,processes, | महापालिका निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी

महापालिका निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी

Next
मदनगर : २०१८ मध्ये होणाºया महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र मिळाले आहे. त्यानुसार शहरातील मतदार याद्या ३ आॅक्टोबरपासून अद्ययावत करण्याबाबत प्रशासनाने तयारी केली असून शहरात मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी दोनशे बीएलओ (ब्लॉक लेवल आॅफिसर) नियुक्त केले आहेत.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दोन-तीन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाºयांनी मतदार पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार २०१८ मध्ये होणाºया महापालिका, विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्यानुसार शहरात महापालिकेची निवडणूक २०१८ मध्ये होणार आहे. नगर महापालिकेसोबत राज्यातील सांगली- मिरज-कुपवाडा, जळगाव, धुळे महापालिकेची निवडणूक २०१८ मध्ये होत आहे. नगर महापालिकेची पंचवार्षिक मुदत ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपत आहे. म्हणजे त्यापूर्वी दोन महिने आधी म्हणजे पुढील वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील. त्यासाठी १ जानेवारी २०१८ रोजीची अंतिम मतदार यादी निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे, वगळणे याबाबतचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने २०० कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्यांची आढावा बैठकही महापालिकेत झाली. आयुक्त घनश्याम मंगळे आणि प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. सर्व कर्मचारी नगर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत.-----------एका प्रभागात चार नगरसेवकसध्या एका प्रभागात दोन नगरसेवक आहेत. आगामी निवडणुकीत एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. सध्या ३४ प्रभाग आहेत. ते निम्मे होतील. आधी मतदार यादी अद्ययावत होईल. त्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाकडून वार्डरचना तयार करण्यात येईल. सध्या एका प्रभागात सात ते आठ हजार मतदार आहे. ती संख्या दुप्पट म्हणजे १८ ते २० हजार एवढी होईल. निवडणूक लढविणाºया उमेदवारांची संख्याही वाढणार आहे.------------जनतेमधून महापौरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे झालेल्या महापौर परिषदेत ‘ड’ वर्ग महापालिकांमधील महापौर जनतेमधून थेट निवडण्याची घोषणा केली. नगर महापालिका ‘ड’ वर्गातील आहे. नवखे उमेदवार आधी महापौरपदाची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. चार ते पाचवेळा निवडून आलेले नगरसेवक महापौरपदाचे दावेदार असतील. ही निवडणूक नगरच्या आमदारकीची रंगीत तालीम ठरणार आहे.

Web Title: muncipal,corportation,election,processes,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.