Lok Sabha Election 2019 : शिर्डीतून आमदार भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसकडून उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:13 PM2019-03-20T12:13:31+5:302019-03-20T12:16:06+5:30

काँग्रेसने मंगळवारी रात्री उशीरा महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली.

Lok Sabha Election 2019: MLA Bhausaheb Kamble in Shirdi candidate from Congress | Lok Sabha Election 2019 : शिर्डीतून आमदार भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसकडून उमेदवारी

Lok Sabha Election 2019 : शिर्डीतून आमदार भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसकडून उमेदवारी

Next

अहमदनगर : काँग्रेसने मंगळवारी रात्री उशीरा महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात शिर्डीमधून श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिर्डीतून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आमदार कांबळे, उत्कर्षा रुपवते, राजू वाघमारे यांची नावे चर्चेत होती. यात कांबळे यांना तिकीट दिले आहे. कांबळे हे गत दोन विधानसभांमध्ये श्रीरामपूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. २००९ पासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव असून त्यात काँग्रेसला यश मिळविता आलेले नाही. काँग्रेसने प्रथमच स्थानिक व पक्ष संघटनेतून पुढे आलेला उमेदवार दिला आहे.
 

Web Title: Lok Sabha Election 2019: MLA Bhausaheb Kamble in Shirdi candidate from Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.