निघाले विधानसभेत, पोहोचले लोकसभेत

By Admin | Published: May 30, 2014 11:13 PM2014-05-30T23:13:57+5:302014-05-31T00:22:49+5:30

सदाशिव लोखंडे: मुरकुटेंमुळेच खासदार झालो; मी १ ७ दिवसातला खासदार

In the Legislative Assembly, in the Legislative Assembly | निघाले विधानसभेत, पोहोचले लोकसभेत

निघाले विधानसभेत, पोहोचले लोकसभेत

googlenewsNext

श्रीरामपूर: ‘ओ, या हो मुरकुटे या. तुमच्यामुळेच मी खासदार झालो. मी १७ दिवसातला खासदार आहे. मुरकुटे यांची व माझी विधानसभेच्या श्रीरामपूर राखीव जागेविषयी चर्चा सुरू होती. श्रीरामपूर विधानसभा लढवायची चर्चा होती. पण पोहोचलो थेट लोकसभेत. ’ देशातील लक्षवेधी व व्ही.आय.पी.लोकसभा मतदारसंघ असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सदाशिव लोखंडे मनमोकळेपणाने कर्जत-जामखेड ते दिल्ली व्हाया कुर्ला-चेंबूर-मुंबई या भाजपा मनसेमार्गे शिवसेना हा राजकीय प्रवास सांगत होते. मोदी सरकारच्या शपथविधीस दिल्लीत सहकुटुंब हजेरी लावून ते शुक्रवारी शिवसेनेवर सर्वाधिक प्रेम करणार्‍या श्रीरामपूरमध्ये आभारसभेसाठी आले होते. लहू कानडे यांच्या निवासस्थानी शिवसेना संपर्कप्रमुख सुहास सामंत, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख डॉ. महेश क्षीरसागर, तालुकाप्रमुख देवीदास सोनवणे, शहरप्रमुख सचिन बडदे आदी पदाधिकार्‍यांसमवेत लोखंडे यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. ‘मला न पाहताच लोकांनी मला मतदान केलं. त्यामुळे या मतदारांना भेटण्यासाठी मी आता मतदारसंघात आलो आहे. संपूर्ण मतदारसंघातील मतदारांनी जातपात न पाहता माझ्यावर, शिवसेनेवर, विश्वास टाकला. श्रीरामपूरच्या अनेक नगरसेवकांनी साथ दिली. या सर्वांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. कालच मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मतदारसंघातील मुळा प्रवरा वीज संस्था, शिर्डी, निळवंडे-भंडारदरा अशा महत्त्वाच्या पाच प्रश्नांबाबत निवेदन दिले. पाठपुरावा केल्याशिवाय कामं होत नाहीत. पैसे घेऊन शिवसेनेची उमेदवारी दिली जाते, असा गैरसमज निवडणुकीच्या काळात होता. पण स्वत: शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवसाहेबांनी शोधून, बोलावून घेऊन शिवसेनेची उमेदवारी दिली. एक पैसाही द्यावा लागला नाही. पूर्वी कर्जत-जामखेडचा १५ वर्षे भाजपाचा आमदार होतो. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांशी ओळखी आहेतच. आता शिवसेनेत आहे. त्यामुळे मी टू-इन-वन खासदार आहे. दोन्ही पक्षातील मैत्रीचा विकास कामांसाठी उपयोग होईल.’ यावेळी मला न बघता मतदान केले. पुढच्या वेळी काम बघून मतदान करा.’ असेही खा. लोखंडे म्हणाले.

Web Title: In the Legislative Assembly, in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.