आठवडाभरानंतर मिळतो कोरोना तपासणी अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:21 AM2021-03-26T04:21:35+5:302021-03-26T04:21:35+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचा कोरोना तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयातून प्राप्त होण्यास तब्बल आठवडाभर वाट पाहावी लागत ...

Corona inspection report is available after a week | आठवडाभरानंतर मिळतो कोरोना तपासणी अहवाल

आठवडाभरानंतर मिळतो कोरोना तपासणी अहवाल

Next

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचा कोरोना तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयातून प्राप्त होण्यास तब्बल आठवडाभर वाट पाहावी लागत असल्याचे प्रकार सुरू आहेत.

विसापूर येथील काही नागरिकांनी बुधवारी (दि. १७) श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणीसाठी घशातील स्रावाचे नमुने दिले होते. त्यांचा अहवाल तब्बल आठवड्याने बुधवारी (दि. २४) रात्री संबंधितांना प्राप्त झाले. त्यामुळे आपण कोरोना पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह हे समजण्यासाठी संबंधितांना आठवडाभर वाट पाहावी लागत आहे.

श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयातून घशातील स्रावाचे नमुने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्यानंतर ते अहवाल प्राप्त होईपर्यंत अनभिज्ञ असतात. जिल्हा रुग्णालयाकडून संबंधित व्यक्तीला तपासणी अहवाल थेट प्राप्त होतो. मात्र, हा अहवाल संबंधितांना कमीत कमी वेळात मिळणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तपासण्यांचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जिल्हा रुग्णालयातून दोन दिवसांत तपासणी अहवाल प्राप्त होत होते. अहवाल प्राप्त होताच प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय केले जात होते. आता कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयिताचा तपासणी अहवाल आठवड्याने प्राप्त झाल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह असल्यास प्रशासन काय उपाय योजना करणार हा प्रश्नच आहे.

Web Title: Corona inspection report is available after a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.