व्हाटस् अ‍ॅपवर अनिल राठोड यांची बदनामी

By admin | Published: May 25, 2014 11:56 PM2014-05-25T23:56:47+5:302014-05-26T00:23:42+5:30

अहमदनगर : शिवसेनेचे उपनेते आमदार अनिल राठोड यांची बदनामी करणारा मजकूर व्हॉटस अ‍ॅपवर टाकल्याप्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Anil Rathod's slander on the What's App | व्हाटस् अ‍ॅपवर अनिल राठोड यांची बदनामी

व्हाटस् अ‍ॅपवर अनिल राठोड यांची बदनामी

Next

अहमदनगर : शिवसेनेचे उपनेते आमदार अनिल राठोड यांची बदनामी करणारा मजकूर व्हॉटस अ‍ॅपवर टाकल्याप्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अवमान व बदनामी करणार्‍या अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याच्यावर सायबर क्राईम अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी कदम यांनी तक्रारीत केली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजपाला मिळालेले यश पाहता विधानसभेच्या दृष्टीने शिवसेनेमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन-चार दिवसांपासून आमदार अनिल राठोड यांच्याविषयी अवमानकारक भाषा, बदनामी करणारा मजकूर सोशय मीडियाच्या माध्यमातून फिरत आहेत. शनिवारी दुपारी एका व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवर राठोड यांची बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाला. यामध्ये राठोड यांचे छायाचित्र, नोटा आणि काही मजकूर असे त्याचे स्वरुप आहे. राठोड यांच्यावर झालेल्या आरोपामुळे शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक विक्रम राठोड यांनी शनिवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तक्रार दिली आहे. (प्रतिनिधी)आमदार अनिल राठोड यांच्याविषयी गेल्या तीन दिवसांपासून सोशल मीडियाद्वारे अवमान करणारा मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. यापूर्वी आलेला मजकूर सभ्य भाषेतील होता. त्यामुळे त्याचे काहीच वाटले नाही. मात्र असभ्य भाषा, बिनबुडाचे आरोप करणारा मजकूर यामुळे शिवसैनिकांच्याही भावना दुखावल्या आहेत. मजकूर टाकणारा तो कोण याची माहिती आहे, मात्र त्याचा पुरावा नसल्याने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पहिल्यांदा मजकूर टाकणारा तो कोण, याचा शोध घ्यावा, अशी मागणी नगरसेवक विक्रम राठोड यांनी कोतवाली पोलिसांकडे केली.लोकसभेतील विधानसभेतही शिवसेनेला चांगले दिवस आले आहेत. त्यादृष्टीने नगर शहर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी दावा केला आहे. त्यामुळे राठोड-प्रा. गाडे यांच्यात शीतयुद्ध रंगले आहे. यातून बदनामीचा प्रकार झाल्याची शक्यता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मोदी यांच्या विजयाच्या जाहिरातीमध्ये दक्षिण जिल्हा प्रमुख असलेल्या प्रा. शशिकांत गाडे यांचे नाव वगळण्यात आले होते. तोच कित्ता प्रा. गाडे यांनी गिरवला आहे. खा. गांधी-लोखंडे यांच्या विजयाचे फलक प्रा. गाडे यांनी लावले. त्यामध्ये त्यांनी आमदार राठोड यांचे नाव वगळले. काही दिवसांपूर्वी प्रा. गाडे व राठोड यांची तुलना करून शिवसेनेचा उमेदवार कोण हवा?असा मजकूर छायाचित्रांसह सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला होता. तसाच प्रकार शनिवारी पुन्हा घडला आहे.

Web Title: Anil Rathod's slander on the What's App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.