अकोले तालुक्यात पिकअप पलटी, २५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:50 PM2018-08-27T12:50:09+5:302018-08-27T12:50:47+5:30

रुंभोडी शिवारात विठे घाटाच्या सुरुवातीला अकोले-राजूर रस्त्यावर स्वाद ढाब्याजवळच्या वळणावर पिक पलटी होऊन २२ ते २५ जण जखमी झाले.

25 people injured in pick-up accident in Akole taluka | अकोले तालुक्यात पिकअप पलटी, २५ जण जखमी

अकोले तालुक्यात पिकअप पलटी, २५ जण जखमी

googlenewsNext

अकोले : रुंभोडी शिवारात विठे घाटाच्या सुरुवातीला अकोले-राजूर रस्त्यावर स्वाद ढाब्याजवळच्या वळणावर पिक पलटी होऊन २२ ते २५ जण जखमी झाले.
सर्व अपघातग्रस्तांना अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना राजूरहून अकोले येथे उपचारासाठी नेण्यास आमदार वैभव पिचड यांनी मदत केली. रुग्णालयातही ते बराच वेळ थांबून जखमींच्या प्रकृतीची विचारसपूस करीत होते. विठे ठाकरवाडी येथून कामगार घेऊन पिकअप गाडी इंदोरीकडे येत होती. स्वाद हॉटेल जवळच्या वळणावर पीक अप गाडीने दोन पलट्या खाल्या सर्व प्रवासी गाडी बाहेर फेकले गेले. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: 25 people injured in pick-up accident in Akole taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.