लाइव न्यूज़
 • 05:37 PM

  साताऱ्यात उदयनराजेंचा सत्कार सोहळा आज. उदयराजेंच्या वाढदिवसाला शरद पवार उपस्थित राहणार. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहणार.

 • 05:16 PM

  पीएनबी बँक घोटाळा - निरव मोदी आणि मेहुल चोकसीचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.

 • 04:25 PM

  कल्याण- भाजपा नगरसेवर महेश पाटील यांची पत्नी पल्लवी पाटील यांनी रिव्हॉल्वर दाखवून धमकाविल्या आरोप. नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी धमकाविल्याचा आरोप.

 • 04:20 PM

  वाशिम- झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या. गव्हा येथील घटना. आत्महत्येचं कारण अस्पष्ट.

 • 03:58 PM

  इस्लामपुरात खासदार शेट्टी यांच्या पुतळा जाळला. स्वाभिमानीचे कार्यालय फोडलं.सदाभाऊ खोत यांच्या गाडीवरील दगडफेकीला रयत क्रांती संघटनेचं प्रत्युत्तर.

 • 02:52 PM

  मध्य प्रदेश पोटनिवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत मुंगावलीमध्ये 47.01 टक्के आणि कोलारासमध्ये 44.84 टक्के मतदान.

 • 02:47 PM

  जस्टीस लोया मृत्यूप्रकरणी सरकारचा प्रचंड दबाव. वकील प्रशांत भुषण यांचा नागपूरमध्ये गौप्यस्फोट. सीबीआय नीष्पक्ष तपास करू शकत नाही. मृत्यू कसा झाला याची चौकशी व्हायला हवी. तपासासाठी एसआयटी नियुक्त करा. प्रशांत भुषण यांची मागणी.

 • 02:41 PM

  नांदेड: नागसेननगर भागात पत्नीने केला पतीचा खून. शाम नारायण सरपे असे मृताचे नाव असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.दुपारी 1 वाजेची घटना.

 • 02:12 PM

  जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या त्या आदिवासी मुलाच्या कुटुंबाला केरळ सरकार 10 लाख रुपये देणार.

 • 02:06 PM

  अहमदनगर - खासदार दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल, अपहरण, खंडणी आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

 • 02:02 PM

  जम्मू काश्मीरात उरी सेक्टरमध्ये सकाळी 11.50 वाजता शस्त्रसंधीचं उल्लंघन.

 • 01:52 PM

  तालिबानी दहशतवाद्यांचा अफगाणिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला, 18 सैनिक ठार.

 • 01:43 PM

  कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत पोलीस बंदोबस्तात बार्शीमध्ये दाखल

 • 01:36 PM

  औरंगाबाद : उपकुलसचिव ईश्वर मंझाविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल. प्राध्यापकपदी नोकरी लावण्याच्या अमिषाने २७ लाख ५० हजार रुपयाची केली फसवणूक.

 • 01:34 PM

  नीरव मोदीच्या मालमत्तावंर ईडीची छापेमारी सुरूच. मुंबई, पुणे, अलिबागमधील मालमत्तांवर ईडीचे छापे. तब्बल 523.72 कोटींच्या मालमत्तेवर कारवाई.

All post in लाइव न्यूज़

All post in शहरं

All post in मनोरंजन

All post in व्हिडीओ

All post in लाइफ स्टाइल

All post in फ़ोटोफ्लिक

All post in क्रीडा

All post in तंत्रज्ञान

All post in ऑटो

All post in अध्यात्मिक

All post in राशी भविष्य

All post in युवा नेक्स्ट

All post in संपादकीय

All post in ब्लॉग्स

प्रमोटेड बातम्या