आयात नेत्याला घेऊन फिरणारे माझ्यासोबत फोटो काढण्यासही घाबरतात; उत्पल पर्रीकरांचा श्रीपाद नाईकांना टोला

By किशोर कुबल | Published: April 26, 2024 02:39 PM2024-04-26T14:39:27+5:302024-04-26T14:41:34+5:30

मंत्री बाबुश मोन्सेरातवर निशाणा.

utpal parrikar controversial statement against bjp leader shripad naik in goa | आयात नेत्याला घेऊन फिरणारे माझ्यासोबत फोटो काढण्यासही घाबरतात; उत्पल पर्रीकरांचा श्रीपाद नाईकांना टोला

आयात नेत्याला घेऊन फिरणारे माझ्यासोबत फोटो काढण्यासही घाबरतात; उत्पल पर्रीकरांचा श्रीपाद नाईकांना टोला

किशोर कुबल, पणजी : दोन महिन्यांपूर्वी दिवंगत पर्रीकर यांच्याबद्दल अनुद्गार काढणाऱ्या आयात नेत्याला घेऊन फिरणारे  उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार प्रचारासाठी माझी मदत घेण्यास, माझ्यासोबत फिरण्यास किंवा सोबत फोटोदेखील काढण्यास तयार होतील असे वाटत नसल्याचे विधान करुन उत्पल पर्रीकर यांनी श्रीपाद नाईक यांना टोला लगावला आहे.

ते म्हणाले कि, ‘ एवढे असूनही केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच सत्तेवर यावे, ही माझी भूमिका आहे. व त्यासाठी श्रीपाद नाईक व पल्लवी धेंपे दोघेही गोव्यातून विजयी होऊन लोकसभेवर जाणे आवश्यक आहे.

उत्पल यांची या निवडणुकीत भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांना प्रसार माध्यमांनी बोलते केले. उत्पल म्हणाले की,‘ मोदी यांच्याकडेच पुन्हा सत्ता गेली पाहिजे. कारण दुसरीकडे इंडिया आघाडीची गत म्हणजे ‘सर्कस’ झालेली आहे. या सर्कसला ‘रिंग मास्टर’ही नाही. दरवर्षी एक नवीन पंतप्रधान म्हणे ही आघाडी देणार आहे. प्रत्यक्षात त्यांना आपला स्वत:चा नेता कोण, हेच ठाऊक नाही.’

Web Title: utpal parrikar controversial statement against bjp leader shripad naik in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.