राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३१.७७टक्के मतदान; परभणीत सर्वाधिक ३३.८८ टक्के मतदानाची आघाडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 02:34 PM2024-04-26T14:34:04+5:302024-04-26T14:35:39+5:30

दुपारच्या वाढणाऱ्या उन्हाचा अंदाज बघता मतदारांनी सकाळपासूनच मतदारसंघावर रांगा लावायला सुरुवात केली .

about 31.77 percent polling till 1 pm in eight lok sabha constituencies in the state highest polling lead of 33.88 percent in parbhani | राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३१.७७टक्के मतदान; परभणीत सर्वाधिक ३३.८८ टक्के मतदानाची आघाडी 

राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३१.७७टक्के मतदान; परभणीत सर्वाधिक ३३.८८ टक्के मतदानाची आघाडी 

राजरत्न सिरसाट, अकोला: लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता पासून सुरुवात झाली असून सकाळी दुपारी १ वाजता पर्यंत राज्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.

दुपारच्या वाढणाऱ्या उन्हाचा अंदाज बघता मतदारांनी सकाळपासूनच मतदारसंघावर रांगा लावायला सुरुवात केली . ११ वाजेपर्यंत सर्वच मतदार संघाची रांगच रांग होती. त्यामुळे अकरा वाजता पर्यंत १८ .८३ टक्के मतदान झाले होते .दुसऱ्या टप्प्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ -वाशिम, बुलढाणा, वर्धा ,नांदेड, परभणी व हिंगोली या आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

दरम्यान, दुपारी १ वाजता पर्यंत अकोला लोकसभा मतदारसंघात ३२.२५ टक्के मतदान झाले असून, अमरावती लोकसभा मतदारसंघात ३१.४० टक्के, यवतमाळ- वाशिम मतदार संघात ३१.४७ टक्के, बुलढाणा लोकसभा मतदारसंघात २९.०७ टक्के, वर्धा लोकसभा मतदारसंघात ३२.३२ टक्के ,नांदेड लोकसभा मतदारसंघात ३२.९३, परभणी लोकसभा मतदारसंघात ३३.८८तर परभणी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. मतदानाच्या  तिसऱ्या चरणात परभणी मतदार संघ मतदानाच्या टक्केवारीत सर्वाधिक पुढे आहे .मतदानाच्या तिसऱ्या चरणात नांदेड लोकसभा मतदारसंघाचाही मतदानाचा टक्का वाढला आहे . नांदेड लोकसभा मतदारसंघात एक वाजता पर्यंत ३२.९३ टक्के मतदान झाले आहे.

 या आठ लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.३३ टक्के मतदान झाले होते. दुपारी एक वाजता ही टक्केवारी ३१ .७७ वर पोहोचली आहे .विदर्भात आता तापमान तापू लागले आहे . अकोला लोकसभा मतदारसंघातही आकाश निरभ्र झाले असून ढगाळ  वातावरण निवळले आहे. तापमानाचा पारा चढत आहे. यामुळे शहरातील व शहरालगतच्या काही केंद्रावरील मतदाराची संख्या काहीशी रोडावली आहे . परंतु पारा घसरतास पुन्हा मतदानाचा मतदारांचा ओघ वाढण्यास सुरुवात होईल असे एकूण चित्र आहे. 

पश्चिम विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजता पर्यंत मतदानाला वेग आला होता परंतु तापमान वाढल्याने संख्या मतदारांची संख्या थोडी रोडाली असली तरी दुपारी चार नंतर मतदारांचा वाढेल.

Web Title: about 31.77 percent polling till 1 pm in eight lok sabha constituencies in the state highest polling lead of 33.88 percent in parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.