एक कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस नाईक अखेर अटकेत, 'या' प्रकरणी पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 01:39 PM2022-08-10T13:39:38+5:302022-08-10T13:40:08+5:30

तिवडे याने एक कोटी रुपये लाचेची मागणी केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती

Kupwar police arrested suspended police Naik John Vilas Tivade who demanded a bribe of one crore | एक कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस नाईक अखेर अटकेत, 'या' प्रकरणी पोलिसांनी केली कारवाई

एक कोटीची लाच मागणारा बडतर्फ पोलीस नाईक अखेर अटकेत, 'या' प्रकरणी पोलिसांनी केली कारवाई

googlenewsNext

कुपवाड (सांगली) : शेतजमिनीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी निलंबित पोलीस नाईक जॉन विलास तिवडे याने एक कोटी रुपये लाचेची मागणी केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. या निलंबित पोलीस नाईक जॉन तिवडेला कुपवाड पोलिसांनी आज, बुधवारी मिरज येथे अटक केली आहे. तिवडे याच्याविरोधात सप्टेंबर २०२० मध्ये नात्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो दोन वर्षापासून फरार होता. अखेर कुपवाड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

तिवडेने कर्नाटक येथून कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. कुपवाड पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे त्याचा बेळगाव हुबळी परिसरात शोध घेतला होता मात्र तो हाताला लागला नव्हता. आज सकाळी संशयित तिवडे मिरजेत आल्याची बातमी समजतात पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. मुलीचे अपहरण व अत्याचार प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोल्हापुरात लाचेच्या मागणी प्रकरणी गुन्हा दाखल

शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदाराकडे १ कोटी लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निलंबित अंगरक्षक पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे, (रा. कोरोची ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात (दि.६ ऑगस्ट) रोजी शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराचे शेत जमिनीबाबत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे, खंडपीठ पुणे येथे दावा सुरु आहे. दाव्याचा निकाल प्रशासकीय सदस्य माजी जिल्हाधिकारी माने यांना सांगून तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्याचे सांगितले. त्यासाठी तुमच्या विरुध्द पार्टींने एक कोटी देण्याची तयारी दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील तयारी करा असे म्हणून लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर पथकाने लाचेच्या मागणीबाबत दि.२२ मार्च २०२२ रोजी पडताळणी केली. या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीस नाईक जॉन तिवडे याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

Web Title: Kupwar police arrested suspended police Naik John Vilas Tivade who demanded a bribe of one crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.