Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी शेअर केले स्वादिष्ट नॉन व्हेजचे फोटो, नेटीझन्सने सांगितला पवित्र श्रावण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 08:42 AM2022-08-15T08:42:51+5:302022-08-15T08:52:05+5:30

भारतीय परंपरेनुसार सध्या श्रावण महिना सुरू आहे. या पवित्र महिन्यात हिंदु संस्कृती आणि परंपरेनुसार अनेकजण मांसाहार वर्ज्य करतात.

Supriya Sule: Supriya Sule shares delicious non-veg photos, netizens says holy Shravan month | Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी शेअर केले स्वादिष्ट नॉन व्हेजचे फोटो, नेटीझन्सने सांगितला पवित्र श्रावण

Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी शेअर केले स्वादिष्ट नॉन व्हेजचे फोटो, नेटीझन्सने सांगितला पवित्र श्रावण

googlenewsNext

मुंबई/पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अधिक एक्टीव्ह असतात. आपल्या विविध दौऱ्याचे आणि उपक्रमाचे फोटो त्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करतात. मात्र, त्यांनी शेअर केलेला फोटो सध्या वादाचा मुद्दा बनला आहे. इंदापूर येथील एका हॉटेलमध्ये डिनर केल्यानंतरचा त्यांनी फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, नॉन व्हेजेटेरिय पदार्थांच्या डिशेस दिसून येतात. मासा पदार्थांची मेजवाणी केल्याचं त्यांनी या फोटोतून सांगितलं आहे. आता, नेटीझन्से या फोटोवरुन सुप्रिया सुळेंना ट्रोल करत प्रतिप्रश्न केला आहे. 

भारतीय परंपरेनुसार सध्या श्रावण महिना सुरू आहे. या पवित्र महिन्यात हिंदु संस्कृती आणि परंपरेनुसार अनेकजण मांसाहार वर्ज्य करतात. बहुतांशजण श्रावणच्या सोमवारी मांसाहार करत नाही, तर अनेकजण महिनाभर हा श्रावण पाळतात. या महिन्यात भगवान शिव शंकर, भोलेनाथ यांची पूजा केली जाते. मात्र, सुप्रिया सुळे यांनी रविवारी रात्री उशिरा आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन मांसाहारी पदार्थाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, मच्छी फ्रायसह इतरही पदार्थ दिसून येतात. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या असून सुप्रिया सुळे यांना श्रावण महिन्यात मांसाहार केल्याबद्दल प्रश्न विचारले आहेत. तर, काहींनी विनायक मेटेंच्या निधनाचाही दाखला दिला आहे. किमान त्यांच्यावर अंत्यसंस्कार तरी होऊ द्यायचे होते, असे म्हणत या फोटोवरुन सुप्रिया सुळेंवर टिका केली आहे. 

दरम्यान, शरद पवार हे नास्तिक असल्याचं मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एका भाषणात म्हटलं होतं. त्यानंतर, सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचे मंदिरातील फोटो शेअर केले होते. येथील एका कमेंटमध्ये युजर्सने राज ठाकरेंच्या त्या भाषणाचाही संदर्भ दिला आहे.  
 

 

Web Title: Supriya Sule: Supriya Sule shares delicious non-veg photos, netizens says holy Shravan month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.