'मी राज ठाकरेंचे आभार मानतो'; महाराष्ट्रात येण्याआधी ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले, पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 04:17 PM2022-12-09T16:17:58+5:302022-12-09T16:23:38+5:30

खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

MP Brijbhushan Singh has thanked MNS chief Raj Thackeray. | 'मी राज ठाकरेंचे आभार मानतो'; महाराष्ट्रात येण्याआधी ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले, पाहा!

'मी राज ठाकरेंचे आभार मानतो'; महाराष्ट्रात येण्याआधी ब्रिजभूषण सिंह नेमकं काय म्हणाले, पाहा!

googlenewsNext

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना अखेर आपला अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. मात्र आता तेच ब्रिजभूषण सिंह येत्या काही दिवसात पुणे शहरात येणार आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निमित्ताने ते पुण्यात येणार आहेत. यावेळी सर्वांचे लक्ष हे मनसेच्या भूमिकेकडे होते. मात्र मनसे ब्रिजभूषण सिंह यांना कोणताही विरोध करणार नाही, असं पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी सांगितले. 

राजकारणात कुणीही शत्रू नसतो, त्याप्रमाणे कुस्तीचे नियम देखील तसेच आहेत. पराभव झाल्यानंतर सुद्धा कुस्तीतले पैलवान एकमेकांची गळाभेट घेत असतात. ही महाराष्ट्राची संस्कृती असल्यामुळे त्याप्रमाणेच ब्रिजभूषण सिंह यांचे आम्ही स्वागत करु, असं वसंत मोरे म्हणाले. तसेच ब्रिजभूषण सिंग यांनी देखील राज ठाकरे हे माझे वैयक्तिक शत्रू नाहीत, असं एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. 

ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, मनसे मला विरोध करणार नाही, ही चांगली गोष्ट आहे. यासाठी मी राज ठाकरेंचे आभार मानतो. राज ठाकरेंना मी नैतिकरित्या विरोध केला होता. राज ठाकरेंना मी फक्त माफी मागा, असं म्हटलं होतं. तसेच त्यांच्या जागी मी असतो आणि माझ्याकडून काही चूक झाली असती, तर मी नक्कीच माफी मागितली असती, असं ब्रिजभूषण सिंह यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील पैलवान यांच्यासोबत कोणताही भेदभाव करत नाही. मी महाराष्ट्रातील पैलवानांवर माझं प्रेम आहे, असंही ब्रिजभूषण सिंह यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, प्रकृतीच्या कारणामुळे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले नव्हते. यामध्ये इतर कुठलाही विषय नव्हता. राज ठाकरे जरी अयोध्येला गेले नव्हते तरी मनसैनिकांनी आयोजित जाऊन दर्शन घेतलं होते. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकाची ताकद किती आहे हे संपूर्ण देशाला माहित आहे. अन्यथा आमच्याही अंगाला लाल माती लागली आहे. कुस्ती कशी खेळायची याविषयी देखील आम्हाला चांगलेच माहित आहे. मात्र राज ठाकरे यांचा आदेश असल्यामुळे ब्रिजभूषण सिंग यांना मनसे विरोध करणार नाही, असेही वसंत मोरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: MP Brijbhushan Singh has thanked MNS chief Raj Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.