शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ८० शाळा डिजिटल

By admin | Updated: August 19, 2015 02:42 IST

जिल्हा परिषद शिक्षकांच्या नावाने नेहमीच बोटे मोडली जातात. मुख्यालयी राहत नाही, विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत आहे,

सुरेंद्र राऊत  यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षकांच्या नावाने नेहमीच बोटे मोडली जातात. मुख्यालयी राहत नाही, विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत आहे, अशी ओरडही होत असते. मात्र जिल्ह्यातील काही शिक्षकांनी हा समज पूसन टाकण्याचा विडा उचलला असून त्यांनी लोकवर्गणीतून ग्रामीण भागातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ८० शाळा जिल्ह्यात डिजिटल झाल्या असून विद्यार्थ्यांना तत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न चालविला आहे.शासनाकडून शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे उपक्रम राबविले जातात. प्रत्यक्षात मात्र कागदोपत्री आकडेमोड केली जाते. हे आजपर्यंत वास्तव आहे. मात्र काही उपक्रमशिल शिक्षकांनी शाळेत नविन संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. त्यातून वर्ग खोली प्रबोधन करणारी कशी ठरेल यावर भर दिला जात आहे. यातूनच वर्ग खोलीची रंगरंगोटी करण्यात आली. काहींनी यापुढे जाऊनही डिजिटल बोर्डाची संकल्पना राबविली. स्मार्टफोन वापरणाऱ्या शिक्षकांनी अध्यापन कौशल्याल स्मार्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला. पाहता पाहता आडवळणावरच्या गावातील शाळांचे रूप पालटू लागले. गावकऱ्याचाही विश्वास संपादित झाल्याने आर्थिक अडचण वर्गणीतून दूर होऊ लागली. आदिवासी बहूल झरी, मारेगाव तालुक्यातील शाळांचे रुप यातून पालटले. मुकुटबन, बोटोणी, गोंडबुरांडा, आपटी, राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी, बाभुळगाव येथील मादणी, आर्णीतील सुकळी, दिग्रसमध्ये कांडली, यवतमाळमध्ये भारी, अकोलाबाजार, तिवसा, यावली, वडगाव गाढवे यासह जिल्ह्यातील ८० शाळांचा कायापालट झाला आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम राबविणाऱ्यामध्ये एकही पुरस्कार प्राप्त शिक्षक नाही. त्यांनी केवळ जबाबदारी म्हणून बदलाचा प्रयत्न सुरू केला आहे. भविष्यात पुरस्कार मिळावा, कुणाच्या कौतुकाची थाप पडावी, अशी अपेक्षा सुध्दा या शिक्षकांना नाही. केवळ केलेल्या कामातून समाधान मिळावे इतकीच माफक अपेक्षा ठेवून ते कार्यरत आहे. मुलांनाही पारंपारिक पध्दतीपेक्षा डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकविलेले विषय सहज लक्षात राहातात. यातून शिक्षकांचीही एनर्जी वाचते आणि वर्गात एक वेगळाच आनंद मिळत असल्याचे शिक्षक सांगतात.