शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उमेदीच्या काळातच तरुणाई अडकतेय गुन्हेगारीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

यवतमाळ शहरासह ग्रामीण भागात शाळकरी मुलांमध्ये धारदार हत्यार बाळगण्याचा ट्रेंड आहे. मुले गांजाच्या नशेला बळी ठरत आहे. मुलांना मोबाईल, वाहन सहज उपलब्ध होते. पालक वर्ग आपल्या दैनंदिन कामातच व्यस्त असतो. त्यामुळे मुलांच्या हालचालींकडे लक्षच देता येत नाही. यातूनच मुले वाममार्गाला लागतात. जेव्हा माहिती होते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  सराईत गुन्हेगारांकडून बालकांचा वापर केला जातो. यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही विधिसंघर्षग्रस्त बालकांची संख्या वाढत आहे. तो प्रौढ होईपर्यंत अनेक गंभीर गुन्हे त्याच्या शिरावर असतात. खून, लूटमार, अत्याचार या गुन्ह्यांतील आरोपी हे तरुण १८ ते ३० या वयोगटातीलच आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालल्याचे हे लक्षण आहे. वेळीच तरुणांना चांगले पर्याय उपलब्ध करून दिले नाही तर गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहे. काही सराईत गुन्हेगारांकडून अशा मुलांना नादी लावले जाते. यवतमाळ शहरात तर मुलांना सोबत घेऊन गांजा व दारुसारखे व्यसन लावले जाते. नंतर त्यांचा पद्धतशीरपणे वापर होतो. शरीर दुखापतीसोबतच मालमत्तेसंबंधित गुन्ह्यातही तरुणांचाच सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. कायद्याचा धाक नसल्यासारखे ते वावरतात. २७८ बंदिवान ३० च्या आत - खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात १८ ते ३० वयोगटातीलच बंदींचा समावेश आहे. तरुणाई गुन्ह्यात अडकत आहे.  - क्षुल्लक कारणावरून भररस्त्यात खून करणाऱ्यांची संख्या कारागृहात वाढत चालली आहे. 

मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न कारागृहात १८ ते ३० वयोगटातीलच बंदींची संख्या सर्वाधिक आहे. या मुलांनी गंभीर गुन्हा केला याची जाणीवच त्यांना राहत नाही. कारागृहात मात्र वास्तव काय आहे हे त्यांना दिसते. अशा बंदींना चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला जातो, त्यासाठी मार्गदर्शन शिबिरही होतात.     - कीर्ती चिंतामणी, कारागृह अधीक्षक 

पालकांचे लक्ष आहे का? 

यवतमाळ शहरासह ग्रामीण भागात शाळकरी मुलांमध्ये धारदार हत्यार बाळगण्याचा ट्रेंड आहे. मुले गांजाच्या नशेला बळी ठरत आहे. मुलांना मोबाईल, वाहन सहज उपलब्ध होते. पालक वर्ग आपल्या दैनंदिन कामातच व्यस्त असतो. त्यामुळे मुलांच्या हालचालींकडे लक्षच देता येत नाही. यातूनच मुले वाममार्गाला लागतात. जेव्हा माहिती होते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. 

मुलांचा कल ओळखणे आवश्यकमुलांच्या किशोरवयातील मानसिक अवस्थेत बदल होतात. या काळात त्यांना कुटुंबातील व्यक्तींनी वेळ देणे गरजेचे आहे. मुलांचा कल लक्षात घेवून त्यांची एनर्जी, खेळ, संगीत या माध्यमातून बाहेर काढावी. यातून चांगले  सामाजिक वातावरणही तयार करता येते. - डाॅ.प्रशांत चक्करवार, मानसोपचार तज्ज्ञ

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी