शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

नेर आंजती रोडवर तरुणाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 10:25 IST

मंगळवारी सकाळी सात वाजता वाहनचालकांना हा प्रकार दिसला. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने हा घात की अपघात ? अशी चर्चा सुरू आहे.

नेर(यवतमाळ)- नेर तालुक्यातील कारंजा रोडवर एका युवकाचा मृतदेह आढळला. मंगळवारी सकाळी सात वाजता वाहनचालकांना हा प्रकार दिसला. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याने हा घात की अपघात ? अशी चर्चा सुरू आहे. अमोल बबन गौरखेडे (वय ३५) असे मृताचे नाव आहे. तो सकाळी चार वाजता घराबाहेर गेला. तो अशोकनगर नेरचा रहिवासी आहे.कारंजा रोडवर आंजती नेरदरम्यान रस्त्याच्या मधोमध त्यांचा मृतदेह सापडला. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू होता. अपघात असेल तर इतर ठिकाणी मार का लागलेला दिसत नाही, तो अशोकनगरवरून या रोडवर गेला कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी कोलुरा रोडवर बोरकर यांचा असाच मृतदेह आढळला, मात्र त्याचा तपास पुढे सरकला नाही. आता अशाच प्रकारे अमोलचा मृतदेह सापडला. आता हा घात की अपघात ? याचा तपास नेर पोलीस करीत आहे. मृत अमोलच्या मागे मुलगी,पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.