वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची शंका, गावकऱ्यांची घटनास्थळी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 07:54 IST2021-07-10T07:53:42+5:302021-07-10T07:54:24+5:30

मृतदेह बेपत्ता: घटनास्थळावरून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न

Young man killed in tiger attack? A tiger is sitting on the spot yavatmal | वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची शंका, गावकऱ्यांची घटनास्थळी गर्दी

वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची शंका, गावकऱ्यांची घटनास्थळी गर्दी

ठळक मुद्देअविनाश पवन लेनगुरे (१८) असे बेपत्ता असलेल्या युवकाचे नाव आहे. वाघ घटनास्थळी एका झुडपात बसलेला असून गावकरी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहेत

पाटणबोरी(यवतमाळ) : येथून जवळच असलेल्या पिवरडोल येथील एक युवक शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गावालगत शौचास गेला होता. त्यावेळी, वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची शंका गावकरी व्यक्त करीत आहे. युवकाचा मृतदेह अद्यापही आढळून आला नाही. 

अविनाश पवन लेनगुरे (१८) असे बेपत्ता असलेल्या युवकाचे नाव आहे. वाघ घटनास्थळी एका झुडपात बसलेला असून गावकरी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. वनविभागाचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले आहे. अविनाश लेनगुरे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास गावलगत शौचास गेला असता, वाघाने हल्ला करून त्याला गावाशेजारीच असलेल्या एका शेतात फरफटत ओढत नेऊन त्याला ठार केल्याचा अंदाज आहे. शनिवारी पहाटे ५ वाजता ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी असून वाघाने अद्यापही घटनास्थळ सोडले नाही.

Web Title: Young man killed in tiger attack? A tiger is sitting on the spot yavatmal