लग्नाच्या १५ दिवसापूर्वी युवतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 17:44 IST2020-04-21T17:44:17+5:302020-04-21T17:44:52+5:30

परिवार लग्नाच्या तयारीत गुंतलेला होता. अशावेळी अचानक सोनालीने आत्महत्या केल्यामुळे या कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.

Young girl commits suicide 15 days before marriage | लग्नाच्या १५ दिवसापूर्वी युवतीची आत्महत्या

लग्नाच्या १५ दिवसापूर्वी युवतीची आत्महत्या

यवतमाळ - एका १९ वर्षीय युवतीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. तालुक्यातील सायतखर्डा येथे मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे येत्या ३ मे रोजी या युवतीचे लग्न ठरले होते. 

सोनाली विलासराव गजघाटे (१९) रा. सायतखर्डा असे मृत युवतीचे नाव आहे. ३ मे रोजी सोनालीच्या लग्नाची तारीख ठरली होती. त्यामुळे गजघाटे परिवार लग्नाच्या तयारीत गुंतलेला होता. अशावेळी अचानक सोनालीने आत्महत्या केल्यामुळे या कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले आहे. गावातही सोनालीच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या मागे आई व तीन बहिणी असून त्यापैकी एक विवाहित आहे. सोनालीची आई देखील दुर्र्धर आजाराने पीडित आहे. 

आत्महत्येची बाब उघडकीस आल्यानंतर मृतदेह घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. घटनेचा प्राथमिक तपास घाटंजी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल राजेश दाभेकर यांनी केला. तर पुढील तपास पारवा पोलिसांना वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: Young girl commits suicide 15 days before marriage