शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

यवतमाळ ठरले ‘हॉट स्पॉट’

By admin | Updated: April 17, 2017 00:19 IST

मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमानात वाढ नोंदविली जात आहे. मार्च अखेरपर्यंत तापमान ४२ अंशांच्या घरात पोहोचले.

पारा ४३.५ : एप्रिलमध्ये शहरात शतकातील सर्वाधिक तापमान, दुपारी रस्ते सामसूम रूपेश उत्तरवार  यवतमाळ मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमानात वाढ नोंदविली जात आहे. मार्च अखेरपर्यंत तापमान ४२ अंशांच्या घरात पोहोचले. गुजरात आणि राजस्थानचे वारे जिल्ह्याकडे वळले आहे. यामुळे तापमान ४३.५ अंशांच्या घरात पोहोचले. एप्रिल महिन्यात यवतमाळ शहरातील आजपर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद हवामान खात्याने रविवारी घेतली. ही शतकातली पहिली घटना असल्याचे हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले. यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्रात तापमान नोंदविण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. तेथील दस्तावेजानुसार जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान मे महिन्याच्या अखेरीस नोंदविले जाते. त्या तापमानाचा पारा ४२, ४३ अंशांपर्यंत असतो. आजवर एप्रिलचे तापमान ४० अंशापर्यंत चढलेले आहे. त्यामध्ये ४३.५ अंशापर्यंतचा पारा एप्रिलमध्यात आतापर्यंत वर चढला नाही. अचानक तापमानात झालेल्या वाढीने हवामान खातेही अवाक् झाले आहे. यवतमाळ शहरात दुपारच्या वेळी रस्ते सामसूम होत आहे. दुपट्टा बांधल्याशिवाय घराच्या दारातही पाय ठेवणे कठीण झाले आहे. कुलरची हवाही गरम फेकत असल्याने दुपारच्या वेळी घामाघूम झाल्याशिवाय पर्याय नसतो. हवामान अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार ही उष्णतेची लाट नाही. तर वाऱ्याच्या दिशेत एकाकी झालेला बदल याला कारणीभूत आहे. उत्तर अरबी समुद्रात उच्च वातावरणात प्रवाहचक्र निर्माण झाले आहे. यामुळे उत्तरेकडून आणि इशान्येकडून येणारे उष्णवारे वाळवंटाकडून मध्य भारताकडे वळले आहे. यासोबत सूक्ष्म उष्णतेची लाटही वाहत आहे. याचा परिणाम तापमान वाढीवर झाला आहे. यामुळे मार्च अखेरपासूनच तापमानात वाढ नोंदविली जात आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, ४३.५ अंशापर्यंत पारा वर चढल्याने अनेक उलथापालथ होण्याची भीती आहे. याचा सर्वाधिक परिणाम भाजी व्यवसायावर झाला आहे. तर फुल व्यवसायाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. फळबागेला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. उन्हाच्या चटक्याने सांभाराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा सांभार जळाला आहे. याची वाढ खुंटली आहे. तर पालक, मेथी, आंबटचुका, तांदुळकुंद्रा या पालेभाज्याची वाढ खुंटली आहे. टमाटर परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडत आहे. वांगे, भेंडी, ढेमस बरबटीला याचा फटका बसला आहे. यामुळे भाजीपाला उत्पादकाचे उत्पादन घटले आहे. ही लाट आणखी काही दिवस राहणार असल्याने यवतमाळकरांना उन्हाचे चटके बसणार आहे. फुलबागा करपण्याच्या वाटेवर फुलाच्या पाकळ्या अधिक नाजूक असतात. त्यांना उन्हाची प्रखरता सहन होत नाही. यामुळे उगवलेले फुल करपत आहे. तर कळ्या उगवण्यापूर्वीच गळत आहे. गुलाब, गलार्डीया, लीली आणि मोगऱ्याला याचा फटका बसला आहे. बाजारात येणाऱ्या फुलाची संख्या घटली आहे. यामुळे फुल व्यावसायिकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. आठवडी बाजारात ग्राहकांची घट आठवडी बाजारात ग्राहकांची सर्वाधिक वर्दळ पाहायला मिळते. उन्हाचा चटका वाढल्याने ग्रामीण भागाकडून शहराकडे येणाऱ्या ग्राहकाची संख्या घटली. यामुळे रविवारी बाजारात शुकशुकाट होता. आठवडी बाजारात दुकान लावणाऱ्या विक्रेत्यांना फटका सहन करावा लागला.