थर्टी फर्स्टच्या जल्लोषासाठी यवतमाळकर सज्ज

By Admin | Updated: December 30, 2014 23:45 IST2014-12-30T23:45:08+5:302014-12-30T23:45:08+5:30

नववर्षाच्या पूर्वसंध्या अर्थात थर्टी फर्स्ट आगळीवेगळी आणि उत्साहात साजरा करण्याचा बेत यवतमाळकर तरुणाईने आखला आहे. मित्र-मैत्रिणींसोबत धमालमस्ती करण्यासाठी विविध बेत आखले आहे.

Yavatmalar ready for the celebration of Thirty First | थर्टी फर्स्टच्या जल्लोषासाठी यवतमाळकर सज्ज

थर्टी फर्स्टच्या जल्लोषासाठी यवतमाळकर सज्ज

यवतमाळ : नववर्षाच्या पूर्वसंध्या अर्थात थर्टी फर्स्ट आगळीवेगळी आणि उत्साहात साजरा करण्याचा बेत यवतमाळकर तरुणाईने आखला आहे. मित्र-मैत्रिणींसोबत धमालमस्ती करण्यासाठी विविध बेत आखले आहे. एसएमएस आणि वॉटस्अपवरून शुभेच्छांचा रतीब तर दोन दिवसांपासूनच सुरू झाला आहे. आता प्रतीक्षा आहे ती ३१ डिसेंबरच्या रात्री ठिक १२ वाजण्याची.
नवीन वर्ष म्हणजे उत्साह, चैतन्य आणि नवे संकल्प करण्याचा दिवस. यंदा तर थर्टी फर्स्टच्या पार्टीला गुलाबी थंडीनेही रंगत आणली आहे. शेकोट्यांच्या संगतीत थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा मनसुबा महाविद्यालयीन तरुण-तरुणींनीच नव्हे तर ज्येष्ठांनीही केला आहे. काही वर्षापूर्वी थर्टी फर्स्टला नावे ठेवणारेही आता थर्टी फस्टच्या आनंदात डुंबून जात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यत थर्टी फर्स्ट साजरा करीत असल्याने हा इव्हेन्ट कॅश करण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी प्रयत्न चालविले आहे. यात अग्रेसर आहे ते हॉटेल व्यावसायिक. यवतमाळ शहरातील आणि शहरानजीकच्या राज्य मार्गावरील हॉटेल आणि ढाब्यांवर खास थर्टी फर्स्टसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. खवैय्यांसाठी वेगवेगळे मेनूही तयार करण्यात येणार आहे. हॉटेलसोबतच बारमध्येही गर्दी उसळणार हे निश्चित. त्यामुळे बार मालकही कुठे कमी पडू देण्याच्या मन:स्थितीत नाही.
हॉटेल आणि बारमध्ये जाण्यापेक्षा काही जणांनी आपल्या ग्रुपमध्येच थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा निश्चित केला आहे. एखाद्याच्या घरी अथवा फ्लॅटवर हा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचा त्यांचा मनसुबा आहे. त्यासाठी डीजेसह विविध सामग्री आणण्याची तयारी दोन दिवसांपासून सुरू आहे. मात्र अनेक तरुणांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला निश्चित केला आहे. काहींनी व्यसन सोडण्याचा निर्धार केला. तर काहींनी सामाजिक उपक्रम राबविण्याचा निश्चित केला आहे. एकंदरित थर्टी फर्स्ट प्रत्येक जण आपल्या खास शैलीत साजरा करून एकमेकांना शुभेच्छा देणार आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Yavatmalar ready for the celebration of Thirty First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.