यवतमाळ जिल्ह्यात उच्चदाबाच्या विद्युत तारेच्या स्पर्शाने चौकीदाराचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 19:10 IST2020-05-04T19:09:35+5:302020-05-04T19:10:01+5:30

धामणगाव मार्गावर दुकानासमोर साफसफाई करताना उच्चदाबाच्या विद्युत तारेच्या संपर्कात येऊन धक्का लागून चौकीदाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली.

In Yavatmal district, a watchman died on the spot after being touched by a high voltage power line | यवतमाळ जिल्ह्यात उच्चदाबाच्या विद्युत तारेच्या स्पर्शाने चौकीदाराचा जागीच मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात उच्चदाबाच्या विद्युत तारेच्या स्पर्शाने चौकीदाराचा जागीच मृत्यू


लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: धामणगाव मार्गावर दुकानासमोर साफसफाई करताना उच्चदाबाच्या विद्युत तारेच्या संपर्कात येऊन धक्का लागून चौकीदाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. या विजेच्या तारेचा धक्का इतका जबरदस्त होता की, चौकीदाराचे दोन्ही पाय विजेच्या प्रवाहामुळे जागेवरच गळून पडले होते. या घटनेची माहिती नगरसेवक विजय खडसे यांनी पोलिसांना दिली असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.

Web Title: In Yavatmal district, a watchman died on the spot after being touched by a high voltage power line

टॅग्स :Deathमृत्यू