शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजना लाभात यवतमाळ जिल्हा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST

अमरावती विभागातील पाच जिल्हे मिळून ११ हजार ४३० शिबिरे झाली. यातही यवतमाळ जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यात सर्वाधिक चार हजार १०८ आरोग्य तपासणी शिबिर घेऊन ३४ हजार ८०० रुग्णांना लाभ देण्यात आला. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयांमध्ये यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने १ एप्रिलपर्यंत ५८ शस्त्रक्रिया केल्या आहेत.

ठळक मुद्देअमरावती विभागात प्रथम स्थान : सर्वाधिक चार हजार १०८ शिबिरे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ दिला जातो. शासकीय रुग्णालयांप्रमाणे खासगी रुग्णालयातही ही योजना लागू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयाने सर्वाधिक रुग्णांना या योजनेत सामावून घेतले आहे. इतकेच काय कोरोना विषाणू संसर्गाच्या काळातही सर्वाधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचा विक्रमही यवतमाळातील खासगी रुग्णालयाने केला आहे.महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य शिबिरे घेण्यात आली. अमरावती विभागातील पाच जिल्हे मिळून ११ हजार ४३० शिबिरे झाली. यातही यवतमाळ जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यात सर्वाधिक चार हजार १०८ आरोग्य तपासणी शिबिर घेऊन ३४ हजार ८०० रुग्णांना लाभ देण्यात आला. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील १२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयांमध्ये यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने १ एप्रिलपर्यंत ५८ शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यानंतर बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. खासगी रुग्णालयांमध्येही यवतमाळ अव्वल स्थानी आहे. यवतमाळातील येलनारे हॉस्पिटलने लॉकडाऊनच्या काळात अमरावती विभागामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया करून रुग्णांना लाभ दिला. तब्बल १०३ शस्त्रक्रिया एकट्या येलनारे हॉस्पिटलमध्ये झाल्या आहेत. अमरावती विभागात शासकीय व खासगी या दोन्ही रुग्णालयाच्या माध्यमातून जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात यवतमाळ जिल्हा अग्रस्थानी राहिला आहे. जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरीब घटकांना लाभ देण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. त्यामध्ये खासगी व शासकीय रुग्णालय अंतर्भूत केले आहे. ही योजना अधिकाधिक लोकाभिमूख करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सीएमओ डॉ. दर्शन चांडक, डॉ. अंकिता वायकर, योजनेचे जिल्हा समन्वय अधिकारी सुरेंद्र इरपनवार, अतुल नागरगोजे, आरोग्य मित्र अक्षय भागानागरकर या सर्वांच्या पुढाकारात योजनेची व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहे.संसर्गाच्या सावटातही बजावली रुग्णसेवाकोरोना विषाणू संसर्गाचे सातत्याने रुग्ण आढळत असल्याने यवतमाळ शहर रेड झोनमध्ये आले होते. अशा काळात अनेक खासगी डॉक्टरांनी जवळपास कामकाज थांबविले होते. या स्थितीतही यवतमाळ शासकीय रुग्णालय व येलनारे हॉस्पिटलने आपली सेवा अविरत सुरू ठेवत अत्यावश्यक शस्त्रक्रिया पार पाडल्या.लॉकडाऊन काळात शस्त्रक्रिया करण्यामध्ये यवतमाळचे खासगी हॉस्पिटल व शासकीय हॉस्पिटलने विशेष परिश्रम घेतले. त्यामुळेच अमरावती विभागात अव्वल स्थान मिळाले आहे.- डॉ. सुनील वाठोरेविभागीय व्यवस्थापक,जनआरोग्य योजना

टॅग्स :Healthआरोग्य