शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्हा ‘रेड झोन’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

लॉकडाऊनच्या शिथिलतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्या दृष्टीने धोरण ठरविले जात असून पूर्वतयारी केली जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये किती टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवायची याचा निर्णयही स्थानिक पातळीवरच घेतला जाणार आहे. परंतु प्रतिबंधित क्षेत्रात (सील केलेला एरिया) कोणत्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नसून तेथे लॉकडाऊन व संचारबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती : केंद्र शासनाकडे कोरोनाच्या १५ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाच्या दप्तरी कोरोना बाधित १५ रुग्णांची नोंद असल्याने यवतमाळ जिल्ह्याची गणना ‘रेड झोन’मध्ये करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी गुरुवारी ही बाब स्पष्ट केली.जिल्हाधिकारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, सध्यास्थितीत यवतमाळात कोरोना बाधित दहा रुग्ण आहे. परंतु यापूर्वी एकूण पाच रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह येऊन नंतर बरे होऊन घरी गेले. त्यातील तीन यवतमाळात तर प्रत्येकी एक पुणे व मुंबईत बरा झाला. अशा एकूण १५ रुग्णांची नोंद केंद्र शासनाकडे असल्याने यवतमाळ जिल्ह्याचा समावेश ‘रेड झोन’मध्ये करण्यात आला आहे. यवतमाळात सध्या कोरोना बाधित म्हणून उपचारार्थ दाखल असलेल्या सात ते आठ रुग्णांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. पुढील तीन-चार दिवसात ते पॉझिटीव्हच्या परिघाबाहेर निघण्याची शक्यता आरोग्य प्रशासनाने वर्तविली आहे.सोमवारपासून एपीएमसी उघडणारयवतमाळ जिल्हा ‘रेड झोन’मध्ये असला तरी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता शेतीविषयक कोणतीही कामे प्रलंबित राहू नये या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवार २० एप्रिलपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांना शेतमाल खरेदीची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून बाजार समित्या सुरू होणार असल्याने शेतकºयांवरील ताण बºयापैकी कमी होण्यास मदत होणार आहे.४० नमुने निगेटिव्हबुधवारी आरोग्य प्रशासनाने एकूण २०६ नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविले. त्यापैकी ४० जणांची अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून ते सर्व निगेटीव्ह आले. २४ तासात ११८ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.शिथिलतेचे स्थानिक अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना४लॉकडाऊन काळात काय सुरू करावे आणि काय करू नये, कुणाला परवानगी द्यावी, कुणाला देऊ नये याबाबत केंद्र शासनाने मार्गदर्शक तत्वे जारी केले आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनीही सूचना दिल्या आहे. मात्र स्थानिक पातळीवरील अडचणी, कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन परवानगी देण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवरच लॉकडाऊनच्या शिथिलतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्या दृष्टीने धोरण ठरविले जात असून पूर्वतयारी केली जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये किती टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवायची याचा निर्णयही स्थानिक पातळीवरच घेतला जाणार आहे. परंतु प्रतिबंधित क्षेत्रात (सील केलेला एरिया) कोणत्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नसून तेथे लॉकडाऊन व संचारबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरूच राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या