यवतमाळ जिल्ह्यात केवळ ४० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 14:56 IST2020-11-28T14:55:38+5:302020-11-28T14:56:05+5:30
Yavatmal News cotton यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती केवळ ४० टक्के कापूस पडला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात केवळ ४० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या हाती
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती केवळ ४० टक्के कापूस पडला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापूस उत्पादकांची गर्दी ओसरल्याचे चित्र बघावयास मिळते. कापसाला सुरवातीपासूनच अवकाळी पावसाने चांगलाच फटका बसला आहे. तरीही कापसाकडून चांगल्या उत्पादनाची आस लागलेल्या शेतकऱ्यांना बोड अळीने आणि बोण्डसडीने निराश केले. जिथे ओलिताच्या शेतात एकरी १० क्विंटल कापूस पिकत होता, तेथे केवळ तीन ते चार क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या हाती लागला आहे. लागवडीचा खर्च देखील निघणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी शेतात कापसाचे पीक अद्यापही आहे. मात्र त्यांच्या शेतात बोण्ड अळीने उद्रेक केल्याने शेतकरी कापूस चिमट्याने उपटून शेतातच पेटवून देत आहेत.