शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली जीएमसीच्या डॉक्टरांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 18:13 IST

यवतमाळात जिल्हाधिकाऱ्यांनी साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत डॉक्टरांना तंबी दिली. तसेच खाजगी रुग्णालय चालविणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना त्वरीत शो कॉज नोटीस देण्याचे निर्देश अधिष्ठाता आर. पी. सिंह यांना दिले.

ठळक मुद्देखाजगी रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना शो-कॉज नोटीस बजाविण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यातच मृत्युंचा आकडाही दिवसेंदिवस फुगत चालला आहे. प्रत्येक दिवशी सरासरी पाच कोरोनाबाधित रुग्ण दगावत आहे. या बाबीची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांची चांगलीच झाडाझडती घेतली.

जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या 15 ते 20 डॉक्टरांना स्वत:च्या कॅबिनमध्ये पाचारण केले.  अनेकदा समज देऊनही मृत्यूच्या आकडा कमी करण्यासाठी डॉक्टरांना सांगण्यात आले होते. त्यातच वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक डॉक्टर खाजगीरित्या रुग्णसेवा करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह यांना वारंवार प्रशासनाने सूचना केल्या होत्या. मात्र या सूचनांकडे अधिष्ठातांसह डॉक्टरांनी दुर्लक्ष करून आपली खाजगी दवाखाने थाटात सूरू ठेवली.

आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत डॉक्टरांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या. किती वेळा कोव्हीड वॉर्डात डॉक्टरांनी भेटी दिल्या याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीतांकडे विचारणा केली असता डॉक्टरांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे रोस्टर तीन झ्र तीन महिन्यांपासून अपूर्णावस्थेत असल्याचे आढळले. एवढेच नाही तर रुग्णालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू का होत आहे, असे विचारल्यावर डॉक्टरांकडे कोणतेही समाधानकारक उत्तर नव्हते.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत डॉक्टरांना तंबी दिली. तसेच खाजगी रुग्णालय चालविणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना त्वरीत शो कॉज नोटीस देण्याचे निर्देश अधिष्ठाता आर. पी. सिंह यांना दिले.

वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार देणे हे डॉक्टरांचे प्राथमिक कर्तव्य आहे. यात कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. भविष्यात कोव्हीड, नॉन कोव्हीड रुग्णांवर योग्य उपचार करावे. तसेच मृत्यू होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्वत:च्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर प्रशासकीय कारवाई करण्यास बाद्य करू नका, असा सज्जड दमही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह, डॉ. मिलिंद कांबळे यांच्यासह 15 ते 20 डॉक्टर उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस