यवतमाळ जिल्ह्यात 54 कोरोनामुक्त तर 44 नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 18:24 IST2020-11-05T18:23:59+5:302020-11-05T18:24:04+5:30

आज 54 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9241 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 349 मृत्युची नोंद आहे.

In Yavatmal district, 54 corona free and 44 newly positive | यवतमाळ जिल्ह्यात 54 कोरोनामुक्त तर 44 नव्याने पॉझिटिव्ह

यवतमाळ जिल्ह्यात 54 कोरोनामुक्त तर 44 नव्याने पॉझिटिव्ह

यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 54 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 44 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.5) एकूण 627 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 44 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 583 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 335ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10402 झाली आहे. 

आज 54 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9241 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 349 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 93240 नमुने पाठविले असून यापैकी 92838 प्राप्त तर 402 अप्राप्त आहेत. तसेच 82436 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: In Yavatmal district, 54 corona free and 44 newly positive