शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ शहर स्वच्छतेवर आता मुख्याधिकाऱ्यांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:33 IST

शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सत्ताधारी विरोधक एकत्र बसून घनकचरा कंत्राटात आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत. त्यामुळे एकाच संस्थेला अनेक कंत्राट देण्यात आले आहेत. संस्था ‘ब्लॅक लिस्टेड’ करा, अशी मागणी करणाऱ्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी अचानक ‘यू-टर्न’ घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : दिवसातून एकदा होणार कचऱ्याचे वजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सत्ताधारी विरोधक एकत्र बसून घनकचरा कंत्राटात आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत. त्यामुळे एकाच संस्थेला अनेक कंत्राट देण्यात आले आहेत. संस्था ‘ब्लॅक लिस्टेड’ करा, अशी मागणी करणाऱ्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी अचानक ‘यू-टर्न’ घेतला आहे. ही सर्व अनागोंदी लक्षात घेता १४ व्या वित्त आयोगातील पैसा स्वच्छतेवर खर्च करताना पालिका मुख्याधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश दिले आहेत.यवतमाळ नगरपरिषदेत मर्जीतील कंत्राटदाराला चालविण्याकरता आतापर्यंत थेट नगरपरिषद फंडातून देयके दिली जात होती. अव्वाच्या सव्वा दराने सफाई संदर्भातील अनेक कंत्राट एकाच व्यक्तीला दिले आहेत. आता टाटाएस वाहनावरचे कंत्राटही याच पद्धतीने चालविण्यात आले. सामान्य फंंडातील रक्कम संपल्याने नगरपरिषद प्रशासनाला जाग आली. आपले गैरव्यवहार दडविण्यासाठी थेट अनेक फंडे वापरण्यात आले. मात्र जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या कठोर भूमिकेमुळे मुख्याधिकारी व कंत्राटदार अडचणीत आले आहे.जिल्हाधिकाºयांनी शहर स्वच्छतेच्या कंत्राट नव्याने निविदा प्रक्रिया करून देण्याचे निर्देश दिले. शिवाय ही प्रक्रिया कशी करावी, याची विस्तृत माहिती दिली आहे. शहरात कचरा संकलनासाठी स्वतंत्र पॉर्इंट तयार करून मुख्याधिकाऱ्यांनी स्वत:च्या उपस्थितीत कचऱ्याचे वजन करावे, असे सांगितले. मात्र ही अट अधिक जाचक ठरणारी असल्याने याला सौम्य करण्यात आले. कचऱ्याचे वजन स्वच्छता निरीक्षकांनी करावे, मात्र मुख्याधिकाऱ्याने प्रत्येक दिवसाला एक तरी भेट डम्पींग यार्ड व कचरा संकलन केंद्र द्यावी. या सर्वांची नोंद घेण्यात यावी. कंत्राटदाराची देयके काढताना तिसऱ्या एजन्सीकडून त्याचे आॅडीट करून घेण्यात यावे, त्यानंतर १४ वित्त आयोगातील ३ कोटी २१ लाख ४३ हजार १४१ रूपयांची रक्कम खर्च करता येणार आहे. अन्यथा याची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.पिंपळगावात अनधिकृत कंत्राटसंपूर्ण शहर स्वच्छतेचे कंत्राट बाबा ताज या संस्थेला देण्यात आले. त्यानंतरही पिंपळगावमध्ये सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांची व्यवस्था लावण्यासाठी सहा मजुराचे स्वतंत्र कंत्राट देण्यात आले आहे. याची देयके नियमित काढली जाता. स्वच्छतेची यंत्रणा असताना ही विशेष तरतूद कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचप्रमाणे रेकॉर्डवर ट्रॅक्टर दाखवून देयक उचलण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याचे स्पेशल आॅडीट केल्याच मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी आपल्या बिल्डींगमधील यंत्रणेचा आधार घेतल्यास काहीच निष्पन्न होणार नसल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका