यवतमाळमध्ये कार पैनगंगा नदीत कोसळून तीन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 14:52 IST2017-08-25T14:50:59+5:302017-08-25T14:52:24+5:30
यवतमाळमधील उमरखेड-हदगाव मार्गावरील कार पैनगंगा नदीत कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका ट्रकची कारला भीषण धडक बसल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

यवतमाळमध्ये कार पैनगंगा नदीत कोसळून तीन जणांचा मृत्यू
यवतमाळ, दि. 25 - यवतमाळमधील उमरखेड-हदगाव मार्गावरील कार पैनगंगा नदीत कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका ट्रकची कारला भीषण धडक बसल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मार्लेगावजवळ पुलाला कठडे नसलेल्या पुलावरुन ही कार पैनगंगा नदीच्या पात्रात कोसळली. उमरखेड जवळून ही नदी वाहते आणि या नदीच्या पुलावर कठडे नाहीत तिथूनच ही कार नदीमध्ये कोसळली. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. ट्रकची कारला धडक लागल्याने अपघात झाला आहे. परभणी येथील वजन मापे विभागातील निरीक्षक ज्ञानेश्वर गोटे, त्यांची पत्नी रत्ना गोटे व चालक अशा तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.