शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
5
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
6
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
7
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
8
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
9
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
11
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
12
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
13
प्रॅक्टिस वेळी 'दादागिरी'; Live मॅचमध्ये आली तोंडावर पडण्याची वेळ! पृथ्वीसह चौघांच्या पदरी भोपळा
14
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
15
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
16
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
17
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
18
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
19
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
20
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत

यवतमाळ: मुगाच्या शेंगा तोडल्या, मोठ्या भावाला शेतातच संपवले; चार वर्षाची मुलगी म्हणाली, "काकाने..."

By सुरेंद्र राऊत | Updated: August 26, 2025 17:37 IST

माळकिन्ही येथील घटना : चार वर्षाच्या मुलीसमाेरच घडला थरार

गुंज (यवतमाळ) : शेतातील मुगांच्या शेंगा ताेडण्याच्या वादातून लहान भावाने माेठ्या भावाला काठीने बेदम मारहाण करून ठार केले. ही घटना महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथील शेतात मंगळवार, २६ ऑगस्ट राेजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

निलेश अशोक रिंगे (३५) असे मृताचे नाव आहे. नीलेशवर प्रदीप अशोक रिंगे (३०) याने काठीने प्रहार करून त्याला ठार केले. नीलेश याने यंदा कापसाच्या पिकात आंतरपीक म्हणून मुगांचे पीक घेतले आहे. मंगळवारी सकाळी प्रदीप मुगाच्या शेंगा तोडत असताना त्या ठिकाणी माेठा भाऊ निलेश त्यांच्या चार वर्षाच्या मुलीला घेवून आला. नीलेशने शेंगा तोडणाऱ्या प्रदीपला मनाई केली. यामुळे संतापलेल्या प्रदीपने काठीने नीलेशच्या ताेंडावर, डाेक्यावर हल्ला केला. यात निलेश गंभीर जखमी हाेऊन जागीच ठार झाला. यावेळी नीलेशची मुलगी रेणू तेथेच उपस्थित हाेते. वडिलांना रक्ताच्या थाराेळ्यात पाहून रेणूने थेट घराकडे धाव घेतली.  घटनेनंतर आराेपी प्रदीप हा शेतातील झाडाखाली बसून हाेता. चार वर्षाच्या रेणूने वडिलांसाेबत झालेल्या घटनेचा थरार आईला सांगितला. त्यानंतर याची माहिती गावकऱ्यांनी महागाव पाेलिसांना दिली. 

ठाणेदार धनराज नीळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाेलिस बघताच आराेपी प्रदीपने तेथून पळ काढला. महागाव पाेलिस व एलसीबी पथकाने पाठलाग करून आराेपी प्रदीपला ताब्यात घेतले. ही कारवाई सहायक पाेलिस निरीक्षक धीरज बांडे, संतोष बेरगे, मुन्ना आडे, तेजाब रणखांब, रमेश राठोड, कुणाल मुंडकर, सुभाष यादव, सुनील पंडागळे यांनी केली. उमरखेडचे एसडीपीओ हनुमंतराव गायकवाड यांनी घटणास्थळी भेट दिली. 

चिमुकली रेणू घटनेची प्रत्यक्षदर्शी काकानेच वडिलांचा काठीने मारून खून केला, या घटनेची चिमुकली रेणू प्रत्यक्ष दर्शी आहे. तिने हे आईला सांगितल्यानंतर खुनाची घटना गावकऱ्यांना माहिती झाली. पाेलिसांनी आराेपी प्रदीप रिंगे याला दाेराने बांधुन पाेलिस ठाण्यात नेले. मयत नीलेश याच्या मागे गराेदर पत्नी, वडील आणि चार वर्षांची मुलगी रेणू असा परिवार आहे. घटनेने गावात हळहळ व्यक्त हाेत आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी