शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

शरच्चंद्र टोंगो यांचे लिखाण शाश्वत स्वरूपाचे

By admin | Updated: March 2, 2015 02:06 IST

शरच्चंद्र टोंगो हे उत्कृष्ट साहित्यिक, लेखक आणि पत्रकार होते. विचारांनी लिहिणाऱ्या जुन्या-जाणत्या मंडळीत ते अग्रणी होते. त्यांनी केलेले लिखाण हे शाश्वत स्वरूपाचे आहे.

यवतमाळ : शरच्चंद्र टोंगो हे उत्कृष्ट साहित्यिक, लेखक आणि पत्रकार होते. विचारांनी लिहिणाऱ्या जुन्या-जाणत्या मंडळीत ते अग्रणी होते. त्यांनी केलेले लिखाण हे शाश्वत स्वरूपाचे आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा नवीन पिढीला मिळावी यासाठी त्यांच्या विचाराचे कायमस्वरूपी जतन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी येथे केले. सुविख्यात कादंबरीकार, कथा लेखक शरच्चंद्र टोंगो यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन रविवारी येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात झाले. त्याप्रसंगी खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानाहून बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री डॉ.यू.म. पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील अ‍ॅड. के.एच. देशपांडे, प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रवार, प्रा.डॉ. गोविंद देशपांडे उपस्थित होते. यावेळी विजय दर्डा म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींचे वृत्तपत्र ‘नवे जग’ असो की साप्ताहिक लोकमत, शरच्चंद्र टोंगो यांच्या भरीव सहकार्याने ते विकसित झाले. बाबूजींचे आणि त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अमोलकचंद महाविद्यालयात टोंगो सरांनी मला शिकविले. त्यामुळे ते माझेही गुरु आणि मार्गदर्शक होते. ज्यांच्या नावामध्येच साहित्य रंग आहे, देखणेपण आहे, उत्साह, उमंग आणि विचार आहेत असे शरच्चंद्र टोंगो उत्कृष्ट साहित्यिक, लेखक आणि पत्रकार होते. शरच्चंद्र टोंगो यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू भागात विभागता येतील. पहिले म्हणजे साहित्यिक शरच्चंद्र टोंगो हे असे साहित्यिक आहे की त्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द छापण्यात आला आहे. दुसरे म्हणजे त्यांना स्वातंत्र्य संग्रामाचा वारसाही लाभला आहे. गरीबी आणि संकटे झेलूनही अत्यंत विनम्र असे ते साहित्यिक होते. तिसरा पैलू म्हणजे पत्रकारिता होय. नवे जग, अर्ध साप्ताहिक लोकमत, साप्ताहिक लोकमत, सोनाली मासिक आदी वृत्तपत्र मासिकातून त्यांनी केलेले लिखाण उच्च दर्जाचे आहे. टोंगो सर परदेशात असते तर त्यांचा उदोउदो झाला असता. त्यांना साहित्यिकांनी आणि समाजानेही डोक्यावर घेतले असते, असे ते म्हणाले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)