शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महिला नगराध्यक्षांच्या काळात महिलांचीच कुचंबणा

By admin | Updated: May 13, 2014 00:13 IST

शहराला महिला नगराध्यक्ष लाभूनही त्यांच्या कार्यकाळातच महिलांची कुचंबणा होत आहे. महिलांसाठी त्यांनी कोणत्याही सोयी-सुविधा निर्माण न केल्याने शहरातील महिलांना फिरणेही अवघड झाले आहे

वणी : शहराला महिला नगराध्यक्ष लाभूनही त्यांच्या कार्यकाळातच महिलांची कुचंबणा होत आहे. महिलांसाठी त्यांनी कोणत्याही सोयी-सुविधा निर्माण न केल्याने शहरातील महिलांना फिरणेही अवघड झाले आहे.

वणी हे तालुक्याचे ठिकाणी आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील नागिरक दररोज या शहरात बाजारहाटासाठी येतात. अनेक नागरिक कार्यालयीन कामांसाठीही वणीत दाखल होतात. शहरात दाखल होणार्‍या या नागरिकांमध्ये महिलांचा लक्षणीय समावेश असतो. आपल्या कुटुंबासह त्या शहरात येतात. मात्र शहरासह तालुक्यातील या महिलांसाठी वणीत कोणतीच सुविधा नाही. त्यांना साधी लघुशंकेला जाण्यासाठी सुविधा नाही. त्यामुळे त्यांची मोठय़ा प्रमाणात कुचंबणा होत आहे.

महिलांसाठी शहरात कुठेही प्रसाधनगृह अथवा स्वच्छतागृह नाही. महिला नगराध्यक्ष असूनही त्यांनी त्यांच्या कार्यकाळात या बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष केले. महिला नगराध्यक्ष झाल्याने तसेच पंचायत समिती सभापती पदावरही महिला विराजमान झाल्याने तालुक्यातील व शहरातील महिलांना सुरूवातीला प्रचंड अभिमान वाटला. मात्र आता त्याच महिला या महिला पदाधिकार्‍यांच्या नावाने बोटे मोडताना दिसून येतात.

नगरपरिषदेने महिलांसाठी गेल्या दोन वर्षात शहरात एकही प्रसाधन गृह अथवा स्वच्छतालयाची निर्मिती केली नाही.

उलट शहरात पूर्वीची जी काही थोडीथोडकी स्वच्छतागृहे व प्रसाधनगृहे अस्तित्वात आहे, त्यांचीही दयनीय स्थिती झाली आहे. त्यातही महिलांसाठी प्रसाधनगृहे नाहीतच. पुरूषांसाठी असलेली ही प्रसाधनगृहे आता अत्यंत किळसवाणी दिसून येत आहे. त्यामुळे महिलांना लघुशंकेसाठी कुठे जावे, असा प्रश्न पडतो. यात महिलांची प्रचंड कुचंबणा होत आहे.

वणीच्या नगराध्यक्षपदी महिला विराजमान असताना शहरातील व शहरात येणार्‍या महिलांचीच कुचंबणा होत असल्याने महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

महिला प्रसाधन गृहाबाबत नगरपरिषद उदासीन असल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज शहरात येणार्‍यांची संख्याही मोठी आहे. त्या तुलनेत सार्वजनिक प्रसाधन गृहे अत्यंत अपुरी आहेत. शहरातील गजबजलेल्या टिळक चौकात तर महिलाच नव्हे तर पुरुषांसाठीही तातडीने प्रसाधन गृह बांधण्याची गरज आहे. हीच परिस्थिती इतर चौकांतही आहे. प्रसाधन गृह नसल्याने पुरुषांसह महिलांनही उघड्यावरच लघुशंकेला जावे लागत आहे. यापूर्वी वणीच्या नगराध्यक्षपदी अनेक महिला विराजमान होत्या. तरीही महिलांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. सध्या २५ सदस्यीय नगरपरिषदेत नगराध्यक्ष व १२ महिला नगरसेविका आहे. तरीही महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

महिलांसाठी प्रसाधनगृह आवश्यक असताना, सर्वच महिला पदाधिकारी उदासीन आहेत. त्यांना साधी समस्या सोडविता आली नाही. एकाही महिला पदाधिकार्‍यांनी महिलांकरिता शहरात स्वच्छतागृह उभारण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)