शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

स्त्री अर्धांगिणी नव्हे ‘कम्प्लीट’ सहकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 9:56 PM

आजही अनेक घरांमध्ये महिलांना बरोबरीचे स्थान दिले जात नाही. जिथे थोडाबहुत मान दिला जातो, तिथेही तिला पुरुषाची अर्धांगिणी म्हटले जाते. पण स्त्रिया पुरुषांच्या अर्धांगिणी नाहीत, आयुष्यात बरोबरीने वाटचाल करणाऱ्या सहकारी आहेत.

ठळक मुद्देवैशाली डोळस : माळी महासंघातर्फे राज्यातील पहिले महिला अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आजही अनेक घरांमध्ये महिलांना बरोबरीचे स्थान दिले जात नाही. जिथे थोडाबहुत मान दिला जातो, तिथेही तिला पुरुषाची अर्धांगिणी म्हटले जाते. पण स्त्रिया पुरुषांच्या अर्धांगिणी नाहीत, आयुष्यात बरोबरीने वाटचाल करणाऱ्या सहकारी आहेत. किती दिवस आम्ही अर्धे अंग होऊन फरफट राहायचे? आम्हीही कम्प्लीट माणूस आहोत, हे ठासून सांगण्याची आता गरज आहे, असे रोखठोक प्रतिपादन औरंगाबादच्या सुप्रसिद्ध विचारवंत वैशाली डोळस यांनी केले.अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने शुक्रवारी येथील संदीप मगलम्मध्ये राज्यातील पहिले महिला अधिवेशन संपन्न झाले. यावेळी त्या बोलत होत्या. माळी समाजातील पहिल्या महिला आयएएस गृहविभागाच्या उपसचिव भाग्यश्री बानाईत-धिवरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी केंद्रीय सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य प्रगती मानकर होत्या. विशेष अतिथी म्हणून माळी महासंघाचे प्रांताध्यक्ष शंकरराव लिंगे, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष निशिगंधा माळी, औद्योगिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद डाके आदी मान्यवर उपस्थित होते.महिलांची भरगच्च उपस्थिती ठरली लक्षवेधीअखिल भारतीय माळी महासंघाने आयोजित केलेल्या पहिल्या महिला अधवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. पिवळे फेटे घातलेल्या सावित्रीच्या लेकींनी जय ज्योती जय क्रांतीचा घोष केला. विशेष म्हणजे, महिला अधिवेशन असूनही पुरुषांची हजेरी लक्षणीय होती. संपूर्ण सभागृह महिलांनीच भरून गेल्यामुळे पुरुषांची बैठक व्यवस्था बाहेर करण्यात आली. प्रोजेक्टर लावून त्यांना अधिवेशन ‘लाईव्ह’ पाहता आले. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध समाजसुधारकांच्या पुस्तकांच्या स्टॉलवरही यावेळी गर्दी झाली होती.