स्त्री अर्धांगिणी नव्हे ‘कम्प्लीट’ सहकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 21:57 IST2017-12-15T21:56:30+5:302017-12-15T21:57:07+5:30
आजही अनेक घरांमध्ये महिलांना बरोबरीचे स्थान दिले जात नाही. जिथे थोडाबहुत मान दिला जातो, तिथेही तिला पुरुषाची अर्धांगिणी म्हटले जाते. पण स्त्रिया पुरुषांच्या अर्धांगिणी नाहीत, आयुष्यात बरोबरीने वाटचाल करणाऱ्या सहकारी आहेत.

स्त्री अर्धांगिणी नव्हे ‘कम्प्लीट’ सहकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आजही अनेक घरांमध्ये महिलांना बरोबरीचे स्थान दिले जात नाही. जिथे थोडाबहुत मान दिला जातो, तिथेही तिला पुरुषाची अर्धांगिणी म्हटले जाते. पण स्त्रिया पुरुषांच्या अर्धांगिणी नाहीत, आयुष्यात बरोबरीने वाटचाल करणाऱ्या सहकारी आहेत. किती दिवस आम्ही अर्धे अंग होऊन फरफट राहायचे? आम्हीही कम्प्लीट माणूस आहोत, हे ठासून सांगण्याची आता गरज आहे, असे रोखठोक प्रतिपादन औरंगाबादच्या सुप्रसिद्ध विचारवंत वैशाली डोळस यांनी केले.
अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने शुक्रवारी येथील संदीप मगलम्मध्ये राज्यातील पहिले महिला अधिवेशन संपन्न झाले. यावेळी त्या बोलत होत्या. माळी समाजातील पहिल्या महिला आयएएस गृहविभागाच्या उपसचिव भाग्यश्री बानाईत-धिवरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी केंद्रीय सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य प्रगती मानकर होत्या. विशेष अतिथी म्हणून माळी महासंघाचे प्रांताध्यक्ष शंकरराव लिंगे, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र महाडोळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष निशिगंधा माळी, औद्योगिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद डाके आदी मान्यवर उपस्थित होते.
महिलांची भरगच्च उपस्थिती ठरली लक्षवेधी
अखिल भारतीय माळी महासंघाने आयोजित केलेल्या पहिल्या महिला अधवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. पिवळे फेटे घातलेल्या सावित्रीच्या लेकींनी जय ज्योती जय क्रांतीचा घोष केला. विशेष म्हणजे, महिला अधिवेशन असूनही पुरुषांची हजेरी लक्षणीय होती. संपूर्ण सभागृह महिलांनीच भरून गेल्यामुळे पुरुषांची बैठक व्यवस्था बाहेर करण्यात आली. प्रोजेक्टर लावून त्यांना अधिवेशन ‘लाईव्ह’ पाहता आले. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासह विविध समाजसुधारकांच्या पुस्तकांच्या स्टॉलवरही यावेळी गर्दी झाली होती.