शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम आरक्षणासाठी पुन्हा विधेयक आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मलिक यांनी ही घोषणा केली. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

ठळक मुद्देविधिमंडळात घोषणा : वजाहत मिर्झा, ख्वाजा बेग यांच्या प्रश्नाला उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तत्कालीन आघाडी सरकारने २०१४ मध्ये मुस्लीमआरक्षणासाठी अध्यादेश काढला होता. मात्र नंतर या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होऊ न शकल्याने तो व्यपगत झाला आहे. मात्र आता मुस्लीमआरक्षणासाठी पुन्हा लवकरच विधेयक मांडले जाईल, अशी घोषणा अल्पसंख्याक विकास मंत्री यांनी विधिमंडळात केली.काँग्रेसचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ख्वाजा बेग यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मलिक यांनी ही घोषणा केली. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याअनुषंगाने तत्कालीन आघाडी सरकाने ९ जुलै २०१४ रोजी अध्यादेश काढून मुस्लीम समाजाला नोकरीमध्ये व शिक्षणसंस्थांमधील प्रवेशात ५ टक्के आरक्षण लागू केले होते. परंतु, नंतर राज्यात सत्ताबदल झाला. युतीशासना आले. दरम्यान या अध्यादेशाचे २३ डिसेंबर २०१४ पर्यंत कायद्यात रुपांतर करणे आवश्यक होते. असे रुपांतर होऊ न शकल्याने संबंधित अध्यादेश व्यपगत झाला.दरम्यान, त्या अध्यादेशा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र १४ नोव्हेंबर २०१४ रोजी या प्रकरणात अंतरिम आदेश देताना न्यायालयाने शासकीय आणि अनुदानित शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी दिलेले आरक्षण अबाधित ठेवले. परंतु, खासगी विनाअनुदानित संस्थांमधील प्रवेश व शासकीय सेवेतील भरतीसाठी दिलेले आरक्षण स्थगित केले. मात्र ९ जुलै २०१४ ते २३ डिसेंबर २०१४ या काळात या आरक्षणानुसार शिक्षण संस्थांमध्ये झालेले प्रवेश आणि शासकीय सेवेत झालेल्या नियुक्त्या अबाधित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.कोणावरही गुन्हे दाखल नाहीमुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी २०१९ मध्ये राज्यात १७ ठिकाणी आंदोलने झाली. त्यावेळी मोर्चेकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार ख्वाजा बेग यांच्यासह १४ आमदारांनी उपस्थित केला. मात्र या आंदोलनांमध्ये कोणावरही गुन्हे दाखल झालेले नाही, असे स्पष्टीकरण अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिले.

टॅग्स :Muslimमुस्लीमreservationआरक्षण