शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घरी न परतलेल्या पतीचा शोध घेत निघाली पत्नी; रेल्वे ट्रॅकवर पोहचताच तिचे आभाळ फाटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:45 IST

Yavatmal : घाटंजी मार्गावरील बोथगव्हाणजवळ निर्माणाधीन रेल्वे ट्रॅक परिसरात सोमवारी सकाळी एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिस तेथे पोहोचले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घाटंजी मार्गावरील बोथगव्हाणजवळ निर्माणाधीन रेल्वे ट्रॅक परिसरात सोमवारी सकाळी एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिस तेथे पोहोचले.

यापूर्वीच मृताची पत्नी पतीच्या शोधात फिरत असताना तेथे आली. तिने दिलेल्या तक्रारीवरून चापडोह येथील युवकाविरोधात अवधूतवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेतले. जानराव विठोबा मैद (५६) रा. सावरगड असे मृताचे नाव आहे. जानराव हे यवतमाळातील डॉक्टरकडे घरकामाला होते. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ या वेळेत काम करून ते घरी परत येत होते. सावरगड ते यवतमाळ असा नियमित सायकलने प्रवास करीत होते. रविवारी जानराव घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी गीताबाई या पतीचा फोटो घेऊन शोध घेत घरून निघाल्या. त्यांना बोथगव्हाण येथील काही नागरिकांनी रेल्वे ट्रॅकजवळ एक मृतदेह पडून असल्याची माहिती दिली. तेथे जाऊन गीताबाईनी पाहणी केली असता तो मृतदेह जानराव मैद यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना देण्यात आली.

रविवारी रात्री जानराव मैद यांच्यासोबत संशयित प्रफुल्ल गजानन साखरकर रा. चापडोह हा होता, अशी माहिती मिळाली. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी प्रफुल्ल साखरकर याला ताब्यात घेतले. त्याने पोलिसांपुढे गुन्हा कबूल करीत जानरावला दगडाने मारहाण करून ठार केल्याचे सांगितले.

दोन दिवस डांबून युवतीवर अत्याचार

  • शहरातील तलावफैल परिसरात दोन दिवस डांबून ठेवत आरोपीने युवतीवर अत्याचार केला, तर मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने पोलिस ठाण्यात दिली होती.
  • याच दरम्यान, दोन दिवसांनी कशीबशी सुटका करून घरी परतलेल्या मुलीने आपबिती सांगितली. त्यावरून नराधमाविरोधात पोलिसांनी कलम ६४ (१), ६४ (२) (आय), ६४ (२) (के), ६४ (२) (एम) भारतीय न्यायसंहितेनुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.
  • स्वप्निल कुमरे (२०) असे आरोपीचे नाव आहे. त्याने ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पीडितेला ओढत नेऊन एका घरात डांबले. तिथे तुझ्यासोबत लग्न करतो, असे म्हणत तिच्यावर अत्याचार केला. ५ जानेवारी रोजी सकाळी पीडितेची आरोपीने सुटका केली.
  • पीडिता घरी पोहोचल्यानंतर तिने आईजवळ आपबिती सांगितली. त्यावरून शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुजाता मनवर यांच्याकडे देण्यात आला आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Wife finds murdered husband on railway track, shattering her world.

Web Summary : A wife searching for her missing husband discovered his body near a railway track. Police arrested a suspect, who confessed to killing him. In a separate incident, a man was arrested for raping a woman after holding her captive for two days.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ