शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी रुपयांची 'अमृत' योजना पाणीपुरवठ्यात कुचकामी का ठरली ? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 20:37 IST

मुंबईत आढावा बैठक घेवून योजना सुरळीत करण्याचा शब्द : २४ तास पाणीपुरवठ्यासाठी असलेली योजना अजूनही रखडलेली असल्याने सहा दिवसाआड होतोय पाणीपुरवठा.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा येथून यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी राबविलेल्या अमृत योजनेवर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. सदर पैसा हा कुणाच्या घरचा नसून, जनतेचा आहे. त्यामुळे अमृत योजना फेल कशी पडली, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. पुणे, बारामती आणि पिंपरी चिंचवड येथील कामे बघा, असे सांगत कंत्राटदार योग्य काम करत आहे किंवा नाही, अधिकाऱ्यांचे कामावर लक्ष आहे का, याची खबरदारी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. अमृत योजनेच्या अपयशाबाबत मुंबई येथे आढावा बैठक घेतली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

समता मैदानात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी सभापती अरुण राऊत, सतीश भोयर, दिनेश गोगरकर यांच्या नेतृत्वात आनंदराव जगताप, बाबू पाटील वानखडे, चंद्रशेखर चांदोरे, सृष्टी दिवटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार संजय खोडके, आमदार अमोल मिटकरी, आमदार मनोज कायंदे, जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर, चंद्रकांत ठाकरे, बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, अशोकराव घारफळकर, नानाभाऊ गाडबैले, क्रांती धोटे, अरुण राऊत, अमन भाई, लाला राऊत, विवेक देशमुख आदी उपस्थित होते. 

प्रवीण देशमुख यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यातील विविध समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. यवतमाळ शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी बेंबळा प्रकल्पावरून अमृत योजना राबविण्यात आली. मात्र शहरवासीयांना आजही दोन ते तीन दिवसाआड पाणी मिळते. अमृत योजना काही राजकीय लोकांच्या गडबडीने फेल गेल्याचेत म्हणाले.

अजित पवार यांनी संबोधित करताना सुरुवातीला अमृत योजनेवरून चांगलाच संताप व्यक्त केला. अमृत योजना १०० टक्के झाली असती तर सर्वांना पाणी मिळाले असते. शहर वाढीसाठी पाणी, रस्ते, वीज आणि इतर भौतिका सुविधा आवश्यक आहे. स्थानिक लोकांनी कामाचा दर्जा कसा आहे, हे बघायला पाहिजे. जबाबदार नागरिकांचे हे कर्तव्य आहे.

अमृत योजनेच्या अनुषंगाने मुंबई येथे बैठक घेवून त्यात नेमक्या काय अडचणी आहे, याचा आढावा घेऊन कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी तर आभार योगेश धानोरकर यांनी मानले.

जुन्या-नव्याचा वाद नको

आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जुन्या-नव्याचा वाद न घालता निवडणुकीच्या तयारीला लागा. इलेक्टिव्ह मेरीटवर उमेदवार निवडताना तरुण चेहरे, महिला, अनुभवी पदाधिकारी यांना स्थान द्यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. पक्ष, संघटना चालविताना कार्यकर्ते जपले पाहिजे. पक्ष आणि संघटनेचा कणा हा कार्यकर्ताच आहे. त्यामुळे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बोलताना तारतम्य ठेवावे. कुणाचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आजोबा, वडिलांचा वारसा पुढे चालवावा. सर्व समाजाला सोबत घेऊन कार्य करावे, असे सांगितले.

शेती सिंचनासाठी हेड ते टेलपर्यंत पाणी देणार

बेंबळा प्रकल्पाच्या मेन लाईनला सिमेंट लायनिंग केली आहे. उपवितरिकेद्वारे शेवटच्या टेलपर्यंत पाणी गेले पाहिजे, यासाठी सिमेंट लायनिंग योग्य आहे की पाइपलाइन हे ठरवून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावर अॅग्रीकल्चर हब उभारण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल मुंबई, नागपूर येथे कसा जाईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील पाणंद रस्त्यासंबंधी पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याशी चर्चा केली जाईल. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यावर दुजाभाव होणार नाही, असे सांगितले. वृद्ध कलावंतांच्या मानधनाचा प्रश्नही सोडविला जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Why did the multi-crore 'Amrut' scheme fail in water supply?

Web Summary : Ajit Pawar questioned the failure of the Amrut scheme despite crores spent. He emphasized public funds accountability, urging officials and representatives to oversee project quality. He assured a Mumbai review meeting to address the scheme's shortcomings and promised solutions for irrigation and farmer support.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारYavatmalयवतमाळwater shortageपाणी कपातwater scarcityपाणी टंचाई